झारखंडमध्ये नक्षलवाद्यांकडून मोठा पूल आणि भ्रमणभाष मनोरा उद्ध्वस्त !

गेली ६ दशके चालू असलेला नक्षलवाद नष्ट करू न शकणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक

गिरिडीह (झारखंड) – गिरिडीह जिल्ह्यातील बराकर नदीवरचा एक मोठा पूल आणि एक भ्रमणभाष (मोबाईल) आस्थापनाचा मनोरा नक्षलवाद्यांनी मध्यरात्री बाँबने उडवला. यामुळे पुलाची एक बाजू पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे. परिणामी या भागातील वाहतूकही खोळंबली आहे.

 

नक्षलवाद्यांनी घटनास्थळावरून परतण्यापूर्वी तिथे एक चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. त्यात अटक करण्यात आलेला नक्षलवादी प्रशांत बोस आणि त्यांच्या पत्नीला चांगली वैद्यकीय सेवा देण्याविषयीचा, तसेच २१ ते २६ जानेवारी या कालावधीत होणारा ‘प्रतिकार मोर्चा’ यशस्वी करण्याविषयीचा मजकूर लिहिण्यात आला आहे.