काँग्रेसवाले आणि साम्यवादी नेते देववाणी संस्कृतचे महत्त्व समजून घेतील का ?
लेखांक ४
संस्कृत भाषेच्या माध्यमातून हिंदूंनी वाणीच्या शुद्धीचा विचारच नव्हे, तर तिचा अभ्यास करून पिढ्यान्पिढ्या वाणीशुद्धी संक्रमित केली आहे !
कर्नाटकातील भाजप शासनाने ‘कर्नाटक संस्कृत विश्वविद्यालय’ उभारण्यासाठी १०० एकर भूमी संमत केली आहे. या निर्णयाला काँग्रेस, जिहादी आतंकवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि कर्नाटकातील पुरोगामी यांनी विरोध करण्यास आरंभ केला आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी या संस्कृत विश्वविद्यालयाला ‘बेकार’, असेही संबोधले आहे. काँग्रेसचे दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संस्कृतला ‘मृतभाषा’ ठरवून टाकले. प्रत्यक्षात देववाणी असलेली चैतन्यमय संस्कृत भाषा ही मानवाला मिळालेली अनमोल देणगी आहे. अशा संस्कृत भाषेचे जीवनातील महत्त्व सर्वांना समजण्यासाठी हा लेख येथे देत आहोत.
संस्कृत भाषेला नामशेष करण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसवाले !‘ब्रिटीश भारतात आल्यापासून संस्कृत भाषेच्या अधोगतीला सुरुवात झाली. स्वातंत्र्योत्तर काळात तिला ‘मृतभाषा’ म्हणून काँग्रेसने घोषित केले. त्यामुळे अध्यात्मासह व्याकरण, नाट्य, गणित, वास्तूशास्त्र, ज्योतिषशास्त्र इत्यादी सर्वच विषयांतील सर्वोच्च ज्ञानाला आपण मुकलो. शासनकर्त्यांनी संस्कृत न शिकवून आणि तिला ‘मृत ठरवून’ मराठी, तसेच इतर स्थानिक भाषांचा पायाच उद्ध्वस्त केला.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (वर्ष २००७) |
१. संस्कृत हा आमच्या वंशाचा मेंदू आहे !
‘संस्कृत हा आमचा अत्यंत पवित्र आणि अभिमानास्पद वारसा आहे. आमचे धर्मग्रंथ, इतिहास, तत्त्वज्ञान आणि संस्कृती यांची मुळे संस्कृत वाङ्मयात इतकी खोलवर गेलेली आहेत की, खरोखरच संस्कृत हा आमच्या वंशाचा मेंदू आहे.’
– स्वातंत्र्यवीर सावरकर
२. संस्कृत ग्रंथ म्हणजे भारतीयत्व, हिंदुत्व आणि वैदिकत्व !
‘ऑक्सफर्डचे प्राध्यापक मित्र अभिमानाने सांगतात, ‘‘इंग्रजी, शेक्सपीअर आणि क्रिकेट वगळले, तर ‘इंग्रजत्वच’ नष्ट होईल.’’, तसेच संस्कृत, गीता आणि कालीदास यांना वगळले, तर भारतीयत्व, हिंदुत्व आणि वैदिकत्वच नष्ट होईल.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
३. संगणकालाही शुद्ध वर्णमाला अपरिहार्य असल्याने संस्कृत (देवनागरी) लिपीचा वापर सोयीचा होणे
‘इंग्रजीचा अभिमान बाळगणार्या मित्रा, आमची शुद्ध वर्णमाला पहा. संस्कृतची शुद्ध वर्णमाला आणि त्या संस्कृतचे वळण घेणारी मराठीची शुद्ध वर्णमाला ! इंग्रजी डब्ल्यु (w) हा वर्ण ‘ड् अ ब् ल् उ’ असा आहे. हा कसला भयानक भोंगळपणा; पण ती साहेबांची भाषा आहे ना ! ‘साहेब’ म्हणजे साक्षात् देवच ! साहेबाची भाषा अशुद्ध कशी असू शकेल ? आज संगणकाला या भोंगळ अशुद्ध इंग्रजी वर्णमालेचा फार मोठा प्रतिबंध निर्माण झाला आहे, हे ध्यानी घ्या. संगणकाला शुद्ध वर्णमाला अपरिहार्य असते. इंग्रजी वर्णमालेऐवजी आता शुद्ध संस्कृत (देवनागरी) लिपीचा वापर सोयीचा झाला आहे. वर्णाशी संबंध असलेला शास्त्रीय अर्थ हा शुद्ध असेलच. यात संशय काय ? आमचे जे गहन, गंभीर, उत्तुंग तत्त्वज्ञान आहे, जी परिभाषा आहे, त्यांचा शब्द आणि अर्थ हा तर पाया आहे. ‘जग’ हा उन्मेष शब्द तत्त्वाचाच आहे. मानस अर्थ शब्दाशी एकरूप असतो. हे व्याकरणाचा अभ्यास करणार्यांच्या सहज ध्यानी येते.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
४. संस्कृत भाषेचे लाभ
४ अ. संस्कृत बोलणार्यांना मेंदूचे रोग होत नसणे. ‘संस्कृत बोलण्याने मेंदूचे रोगी रोगमुक्त होतील’, असे मेंदूविज्ञान सांगते : ‘संस्कृत बोलणार्यांना मेंदूचे रोग होत नाहीत. मेंदूविज्ञान सांगते, ‘मेंदूचे रोग असतील, त्यांनी संस्कृत बोलावे, म्हणजे ते रोगमुक्त होतील.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
४ आ. ‘संस्कृतमुळे मानसिक क्षमता वाढते’ – नासाच्या सल्लागारांचा अभ्यासपूर्ण दावा ! : ‘नासाचे सल्लागार रिक ब्रिग्ज यांनी अभ्यास करून ‘संस्कृतमुळे मानसिक क्षमता वाढते’, असा दावा केला आहे !’
४ इ. वाणीशुद्धी : ‘पाश्चात्त्य लोक गेल्या ४-५ शतकांत वरवरचे उपाय योजून देहशुद्धीकडे वळले. आता त्यातील काहीजण ‘मनाच्या शुद्धीचा’ विचार करत आहेत. ‘वाणीच्या शुद्धीचा’ त्यांनी विचारच केलेला नाही. संस्कृत भाषेच्या माध्यमातून हिंदूंनी वाणीच्या शुद्धीचा विचारच नव्हे, तर वाणीशुद्धीचा अभ्यास करून पिढ्यान्पिढ्या वाणीशुद्धी संक्रमित केली आहे.’ – श्री. संजय मुळ्ये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘पाश्चात्त्य लोक गेल्या ४-५ शतकांत वरवरचे उपाय योजून देहशुद्धीकडे वळले. आता त्यातील काहीजण ‘मनाच्या शुद्धीचा’ विचार करत आहेत.’
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘देववाणी संस्कृतची वैशिष्ट्ये अन् संस्कृतला वाचवण्यासाठीचे उपाय’)