राष्ट्रीय नेत्याला अभ्यासहीन आणि हास्यास्पद शब्दप्रयोगाद्वारे संबोधणारे किंवा मनाप्रमाणे वागणारे काँग्रेसी !

श्री. रमेश शिंदे

‘स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळातील भारताचे नेते म. गांधी यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी योगदान दिले; म्हणून काँग्रेसींनी त्यांना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी दिली. त्या वेळी त्यांनी पुढील सूत्रांचा विचार केला होता का ?

१. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वीपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप’ इत्यादींना ‘राष्ट्रपुरुष’ म्हणून संबोधले जाते, तर मग छत्रपती शिवरायांसारख्या राष्ट्रपुरुषांना आता म. गांधी यांची मुले म्हणायचे का ?

२. म. गांधी यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधून त्यांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांसारख्या राष्ट्रपुरुषांपेक्षा मोठे संबोधणे योग्य होईल का ? तसे करणे म. गांधी यांना तरी आवडेल का ? तर नाही !

३. पूर्वीपासून आजपर्यंत भारतमातेसाठी अतुलनीय योगदान देणार्‍या व्यक्तींना ‘राष्ट्रगुरु, राष्ट्रसंत, राष्ट्रपुरुष, राष्ट्रभक्त’ इत्यादी संबोधले जाते; परंतु आजपर्यंत कुणालाही ‘राष्ट्रमाता’ किंवा ‘राष्ट्रपिता’ असे संबोधलेले नाही.

म. गांधी यांना आदरपूर्वक ‘राष्ट्रपिता’ असे संबोधण्यास आरंभ करण्यापूर्वी काँग्रेसींनी इतिहासतज्ञ किंवा भाषातज्ञ यांना विचारले होते ? ‘मनाप्रमाणे आचरण केल्यावर त्याचे समाज, राष्ट्र आणि धर्म यांवर कोणते दुष्परिणाम होतात ?’, हे सध्या म. गांधी यांना ‘राष्ट्रपिता’ संबोधायचे कि नाही ?’, याविषयी देशभर चालू असलेल्या वादावरून स्पष्ट होते.’

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती. (९.१.२०२२)