नालासोपारा आणि नेरूळ येथे ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणारे अपप्रकार रोखण्याविषयी विविध ठिकाणी निवेदन !

मुंबई, २९ डिसेंबर (वार्ता.) – ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणारे अपप्रकार रोखण्याविषयीचे निवेदन मुंबईत ठिकठिकाणी देण्यात आले. हिंदु जनजागृती समिती आणि स्थानिक धर्मप्रेमी यांच्या वतीने मुंबई, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात आतापर्यंत २ तहसीलदार, ९ पोलीस ठाणी, ४ शाळा आणि ३ शिकवणीवर्गांत निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आता नालासोपारा पोलीस ठाणे (पश्चिम) आणि नेरूळ पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले.

नालासोपारा पोलीस ठाणे (पश्चिम) येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. मिलिंद विधवनेस, श्री. प्रदीप पांडे, सनातन संस्थेचे श्री. प्रशांत पाटील आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंजुनाथ पुजारी उपस्थित होते. या विषयावरील निवेदन नेरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. अनंत सातपुते, श्री. श्याम पुरोहित आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश सनिल उपस्थित होते.