वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस, तसेच वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेतल्यानंतरही काही जणांना कोरोनाचा नवा प्रकार असलेल्या ‘ओमिक्रॉन’ची लागण झाली आहे. अमेरिकेच्या ‘सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँन्ड प्रिवेंशन’ने म्हटले आहे की, आतापर्यंत अमेरिकेत ओमिक्रॉनचे ४३ रुग्ण आढळले आहेत. त्यांतील ३४ जणांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे, तर १४ जणांनी ‘बूस्टर डोस’ही घेतला होता. यांतील ५ जण असे आहेत ज्यांनी १४ दिवसांच्या आधी लसीचा ‘बूस्टर डोस’ घेतला होता. ओमिक्रॉनच्या ४३ रुग्णांपैकी २५ जणांचे वय १८ ते ३९ च्या दरम्यान आहे. १४ जणांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता. ६ जण आधीच कोरोनाने संक्रमित झाले होते. अनेकांमध्ये खोकला, थकवा अशी सौम्य लक्षण आढळली आहेत.
अवघ्या १० दिवसांत ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांची संख्या ४३ वर पोहचली #OmicronVariant https://t.co/9BcnvLnMBn
— Lokmat (@lokmat) December 11, 2021