‘महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात चंडियाग करण्यात आला. यज्ञ चालू असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यज्ञात आहुती देत होत्या. त्या वेळी त्यांच्या बाजूने मला दोन सावल्या दिसत होत्या. काही वेळाने यज्ञात पुरोहित मंत्रजप करू लागले. तो जप ऐकतांना मला पुष्कळ चांगले वाटले आणि माझे मन आनंदी झाले. माझ्या मनात केवळ गुरुस्मरण होत होते. काही वेळाने परत यज्ञ चालू झाला. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या बाजूने मला चरण दिसू लागले. ‘त्यांतील डावा पाय पुढे आणि उजवा मागे, असे जणू ते चालण्याच्या स्थितीत आहेत’, असे मी अनुभवले. ‘हे देवा, तू इतके अनुभवायला देऊन शिकवतो, त्यासाठी कृतज्ञता !’
– श्रीमती नीलिमा नाईक (वय ५७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.