‘प्रत्येक विषयाला विशिष्ट देवतेचे अधिष्ठान असते, उदा. शिक्षणाला गणपति आणि सरस्वती, धनासाठी श्रीलक्ष्मी, आरोग्यासाठी धन्वन्तरि. त्या विषयाच्या संदर्भातील कृती करतांना प्रथम त्या विषयाच्या अधिष्ठात्री देवतेला प्रार्थना केल्यास त्या देवतेचे तत्त्व कार्यरत होऊन ती कृती जलद आणि परिपूर्ण होण्यास साहाय्य होते. त्या कृतीमध्ये अडथळे आले, तरी त्यावर उपाययोजना काढण्यासही साहाय्य मिळते. त्याचसमवेत कोणतीही कृती करतांना आपली साधना होण्यासाठी कुलदेवतेलाही प्रार्थना करावी.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले