‘वर्ष २०१६ पासून मला विविध विषयांवर सूक्ष्मातून ज्ञान परत मिळू लागले. हे लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर त्या विषयी १ – २ साधक ‘लेख वाचून काय वाटले ?’ या विषयीचे अभिप्राय मला कळवायचे. वर्ष २०१७ मध्ये मला देवाच्या कृपेमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मागील जन्मांचे सूक्ष्मातून ज्ञान मिळाले. या लेखाचे नाव ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गतजन्मांतील घडामोडी आणि त्यांचा टप्प्याटप्प्याने घडलेला आध्यात्मिक प्रवास !’, असे होते. हा लेख दैनिक ‘सनातन प्रभात’च्या तीन अंकांमध्ये क्रमशः प्रसिद्ध झाला होता. या लेखांचा मोठा परिणाम साधकांवर झाला होता. त्या वेळी साधकांकडून सर्वाधिक अभिप्राय या लेखांविषयी मला मिळाले. त्यांतील साधक आणि संत यांचे निवडक अभिप्राय पुढे दिले आहेत.
१. हे लेख आम्हाला पुष्कळ आवडले.
२. हे लेख आम्ही संग्रही ठेवणार आहोत.
३. परात्पर गुरु डॉक्टरांचा मागील जन्मांविषयीचा एक भाग वाचल्यावर आम्ही त्याच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पहात आहोत.
४. आमचा भाव दिवसभर जागृत होत होता.
५. काही साधकांनी ‘ज्या साधकांनी हे लेख अजून वाचले नाहीत’ त्यांना लेख वाचण्याची आठवण करून दिली.
६. काही साधकांनी ‘हे लेख आम्ही परत परत वाचले आहेत’, असे सांगितले.
७. विदेशातील एक साधक मला म्हणाला, ‘‘आम्ही विदेशात रहातो. ‘आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांशी कसे जोडले गेलो आणि आमचा त्यांच्याशी मागील जन्मी कसा संबंध आला ?’, या प्रश्नांची उत्तरे मला तुमच्या लेखातून मिळाली.’’
८. परात्पर गुरु पांडे महाराज आनंदाने मला म्हणाले, ‘‘लेख छान लिहिला. जेव्हा तुम्ही देवदला याल, तेव्हा आपण भेटू.’’
वरील अभिप्रायांनंतर मनाची झालेली विचारप्रक्रिया : परात्पर गुरु डॉक्टरांच्या मागील जन्मांविषयी मला सूक्ष्मातून ज्ञान मिळाले. तेव्हा मला ‘या लेखाला साधक आणि संत यांचा इतका प्रतिसाद मिळेल’, याची जराही कल्पना नव्हती. साधक आणि संत यांचे अभिप्राय ऐकून, ‘मला चांगले ज्ञान मिळाले’, या विषयी स्वतःच्या कौतुकाचे विचार थोडा वेळ माझ्या मनात आले. त्यानंतर माझ्या मनात पुढील विचार आले, ‘साधक आणि संत यांचे परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्कळ प्रेम आहे. त्यांच्यासंदर्भातील विषय हा साधकांसाठी जिव्हाळ्याचा असतो. साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या मागील जन्मांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती. ती उत्सुकता वरील लेखाने पूर्ण झाली. त्यामुळे साधक आणि संत यांना अत्यानंद झाला.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०२३)
|