वैभववाडी – तालुक्यातील लोरे क्रमांक २ येथे शिवगंगा नदीत भूषण नाईक हा तरुण २८ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी येथील ३ मित्रांसह आंघोळीसाठी गेला होता; मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. या वेळी त्याचे ३ मित्र मात्र सुदैवाने वाचले. त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूषण याच्याविषयी येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तहसीलदार रामदास झळके आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोचली असून तरुणाचा शोध घेत आहेत.