सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – परिवहन विभागाने आधार क्रमांकाचा वापर करून ‘ऑनलाईन’ पद्धतीने वाहनचालकांसाठी शिकाऊ अनुज्ञप्ती (वाहन चालवण्याचा परवाना) देण्यास प्रारंभ केला आहे. या प्रक्रियेमध्ये आधार क्रमांकातील नाव, पत्ता आणि छायाचित्र ‘डेटाबेस’मधून स्वयंचलितरित्या घेण्यात येते. या प्रक्रियेच्या अंतर्गत नमुना क्रमांक १ (अ) नुसार वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करतांना ते प्रमाणपत्र केवळ एम्.बी.बी.एस्. पदवीधारक डॉक्टरांचे असावे, असे निर्देशित करण्यात आले आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेद्र सावंत यांनी दिली.