जिल्हाधिकार्‍यांना निवेदन आणि मुनव्वर राणा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन !

वाल्मिकनगर (जळगाव) येथील अखिल भारतीय कोळी महासंघाची तत्पर आणि धर्मरक्षक कृती !

जळगाव, २२ ऑगस्ट (वार्ता.) – कवी मुनव्वर राणा यांनी महर्षि वाल्मीकि यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ २१ ऑगस्ट या दिवशी अखिल भारतीय कोळी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. वाल्मिकनगर भागात कोळी समाजबांधवांच्या वतीने कवी मुनव्वर राणा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी नगरसेवक कैलास सोनवणे, माजी महापौर तथा नगरसेविका भारती सोनवणे यांच्यासह कोळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुनव्वर राणा यांचे घुमजाव !

महर्षिे वाल्मीकि यांच्याविषयीच्या अपशब्दामुळे जळगावमध्ये गुन्हा नोंद होताच कवी मुनव्वर राणा यांनी ‘मी असे वक्तव्य केले नसून याला गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही’, असे म्हटले आहे.