पोलिसांकडून गुन्हा नोंद
मुंबई – मुंबई विमानतळाच्या संरक्षक भिंतीच्या येथे १२ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी पेट्रोल असलेली बाटली फेकण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ‘कुणीतरी खोडसाळपणे हे कृत्य केले असावे’, असे अनुमान पोलिसांनी वर्तवले आहे. असे असले, तरी या प्रकरणी पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे.
या बाटलीत ५० मिलीलिटर पेट्रोल होते. विमानतळाच्या संरक्षक भिंतीच्या बाहेर काही गॅरेज आहेत. कुणीतरी गाडीत पेट्रोल भरल्यानंतर ती बाटली विमानतळाच्या आवारात फेकली असावी, असे अनुमान पोलिसांकडून वर्तवण्यात आले आहे. यामुळे धावपट्टी किंवा विमानसेवा यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. यामागे कोणत्याही प्रकारचे घातपात नसल्याचे अनुमान पोलिसांकडून वर्तवण्यात आले आहे.