निष्क्रीय महापालिका प्रशासन !
मिरज, ५ ऑगस्ट (वार्ता.) – जुलैमध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे पडले आहेत. यातील मिरज बस आणि रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. ‘छत्रपती शिवाजी स्टेडियम’समोर एवढे मोठे खड्डे पडले आहेत की, या ठिकाणी एखादे वाहन अडकल्यास वाहनांच्या रांगा लागतात. या रस्त्यावर केलेले खोदकाम आणि पावस यांमुळे रस्त्यावर चिखल साचल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करत वाहने हाकावी लागत आहेत. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. (जनतेला अशी मागणी का करावी लागते ? जनतेला होणार्या गैरसोयी सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाला दिसत नाहीत का ? – संपादक)