पुणे – गेल्या अनेक दिवसांपासून काही समाजविरोधी घटक येथील नवसह्याद्री, कर्वेनगर आणि देवेश चौक या परिसरात रस्त्यांवरील भिंतींवर ब्राह्मण समाजाच्या विरोधात लिखाण करत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीचे लिखाण भिंतींवर लिहिण्यात आले आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने समाजाला घातक ठरणार्या या वृत्तीचा तीव्र निषेध केला आहे. ३१ जुलै या दिवशी यासंदर्भात महासंघाच्या पदाधिकार्यांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
महासंघाने प्रविष्ट केलेल्या तक्रारीमुळे पोलिसांनी त्या जागेवरील ब्राह्मणविरोधी लिखाण त्वरित पुसले आणि भविष्यात अशा गोष्टींना आळा घालण्याचे, तसेच त्यावर लक्ष ठेवण्याचे आश्वासन दिले.