अतीवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील हानी झालेल्या घरांचे, शेतीचे वस्तूनिष्ठ पंचनामे करण्याच्या डॉ. नीलमताई गोर्‍हे यांच्या सूचना !

पुणे, ३० जुलै – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोर्‍हे यांनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात अतीवृष्टीमुळे बाधित झालेली गावे आणि शेती यांची प्रत्यक्ष पहाणी केली, तसेच प्रशासनाकडून करत असलेल्या उपाययोजनांविषयी माहिती घेत ग्रामस्थांकडून स्थानिक परिस्थितीविषयी अडचणी जाणून घेतल्या आणि अतीवृष्टीमुळे ज्या घरांची आणि शेतीची हानी झाली आहे त्यांचे वस्तूनिष्ठ पंचनामे करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

डॉ. गोर्‍हे यांनी कंकवाडी गावातील झालेल्या शाळेच्या इमारतीच्या हानीची पहाणी करत शाळेतील पुस्तके, संगणक यांसारख्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.