|
तीन पोलीस निलंबित
महोबा (उत्तरप्रदेश) – मोहबा जिल्ह्यामधील खांडुआ गावामध्ये रहाणार्या संजय नावाच्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कारच्या प्रकरणातील आरोपीने गळफास लावून २७ जुलैच्या रात्री मौदाहा कोतवाली पोलीस स्थानकाच्या कोठडीत आत्महत्या केली. संजयला तातडीने जवळच्या जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आले; मात्र त्याचा रुग्णालयामध्ये भरती करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या प्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर पोलीस उपनिरीक्षक आणि २ हवालदार यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचे अन्वेषण आता हमीरपूरच्या अतिरिक्त उपनिरीक्षकांकडे सोपवण्यात आले आहे. संजयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.