नागपूर – जिल्हा परिषद सदस्याला मारहाण करून पक्षशिस्त मोडल्याच्या कारणास्तव नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव गज्जू उपाख्य उदयसिंग यादव यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही कारवाई केली. नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत वाद झाला होता. या वेळी जिल्हा परिषद सदस्य दुधाराम सव्वालाखे यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणाची काँग्रेस कमिटीकडून अंतर्गत चौकशी करण्यात आली होती. पक्षशिस्त मोडून गैरवर्तणूक केल्याचा ठपका गज्जू यादव यांच्यावर ठेवण्यात आला आहे.