सर्व साधकांवर प्रीती करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
वर्ष २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेले दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर होणारी सूक्ष्मातील आक्रमणे, त्यांना होणारे शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास अन् त्यांचा महामृत्यूयोग’ यांसंदर्भातील लिखाण वाचून सौ. सुधा जोशी (रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. सोनल जोशी यांची आई) यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता पुढे दिली आहे.
१. सनातनचे सर्वच साधक-साधिका, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पैलू पाडून घडवलेले हिरे असणे आणि साधकांकडून स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवून घेऊन परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना आईप्रमाणे जवळ केलेले असणे
‘सनातनचे सर्वच साधक-साधिका, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पैलू पाडून घडवलेले जणू हिरेच ! साधकांना भेटल्यावर त्यांच्यातील ‘नम्रता, शिस्तप्रियता आणि दुसर्यांविषयीचा आदर’, हे सद्गुण पहायला मिळतात. त्यांचे तोंडवळे नेहमी हसतमुख असतात. आई जशी बाळाला न्हाऊ-माखू घालून आणि पावडर-तीट लावून जवळ घेते, त्याप्रमाणे गुरुमाऊलींनी साधकांकडून स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवून घेऊन त्यांना जवळ केले आहे. आम्ही त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
२. ‘गुरुदेवांनी आम्हाला जवळ केले’, हे खचितच आमच्या पूर्वजन्मांचे पुण्य असणार.
३. परात्पर गुरु डॉ. आठवलेरूपी कनवाळू देवाने साधकांवरील अनिष्ट शक्तींची आक्रमण स्वतः झेलणे
‘देवाने श्रीखंड्या बनून एकनाथांच्या घरी कावडीने पाणी भरले, त्यांचे कपडेही धुतले; जनाबाईचे दळण दळले, कबिराचे शेले विणले’ इत्यादी गोष्टी मी ऐकल्या होत्या. आता तर हा कनवाळू देव (परात्पर गुरु डॉक्टर) आमच्यावरची अनिष्ट शक्तींची आक्रमणेही स्वतः झेलत आहे !
४. देवा, का रे कष्टविसी सगुण रूपासी ।
देवा, का रे कष्टविसी सगुण रूपासी ।
तू तर एकरूप कृष्णाशी ।। १ ।।
कि खेळवण्या अनिष्ट शक्तींशी ।
असेल का ही तुझी कृष्णनीती ।। २ ।।
असा हा कृपाळू देव आम्हा लाभला ।
तुझ्या चरणी व्यक्त करते कृतज्ञता ।। ३ ।।
देवा, लावलेस आम्हा नामाला ।
कोटी कोटी धन्यवाद तुला ।। ४ ।।
– सौ. सुधा जोशी, दाबोली, वास्को, गोवा. (१७.१.२०१८)
|