ज्ञानोपदेश करणारे गुरु !

प.प. भगवान श्रीधरस्वामी

‘गुरुपौर्णिमा म्हणजेच आषाढ पौर्णिमा. या दिवशी पाऊस असतोच. गुरुपौर्णिमा आणि पावसाळा यात काहीतरी समजून घेण्यासारखे आहे. पाऊस म्हणजे जलवर्षाव आणि जल म्हणजे जीवन. जीवनधारा तत्त्वांचा वर्षाव म्हणजे पावसाळा आणि याच वेळी गुरुपौर्णिमा येते. या दिवशी गुरुही जीवनधारा असे तत्त्व पावसाप्रमाणे वर्षतो. आत्मतत्त्वाचा म्हणजे आत्मज्ञानाचा वर्षाव करतो. पावसामध्ये सर्वसमत्व आहे. त्याचप्रमाणे गुरुही आप-पर, सुष्ठ-दुष्ट असे न पहाता सर्वांस ज्ञानोपदेश करतो.

– प.प. भगवान श्रीधरस्वामी

(संदर्भ : मासिक ‘श्रीधर संदेश’, जुलै १९९८)


‘मोक्षाचे अधिदैवत म्हणजे सदगुरु !’

– प.प. भगवान श्रीधरस्वामी

(संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, ऑक्टोबर २००२)