(म्हणे) ‘भारताने बांधलेल्या इमारती पाडा !’ – पाकच्या गुप्तचर संस्थेची तालिबानला सूचना

पाक तालिबान्यांचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी करणार, हे विविध उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे. भारताने या दोघांच्या विरोधात आक्रमक धोरण राबवणे अपरिहार्य आहे !

सौजन्य :DNI

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने तालिबानला अफगाणिस्तानमध्ये भारताने बांधलेल्या इमारती पाडण्याची सूचना केली आहे. अमेरिकेने वर्ष २००१ मध्ये अफगाणिस्तानमधून तालिबानची सत्ता उलथवून टाकल्यानंतर गेल्या २ दशकांत भारताने अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

भारताने अफगाणिस्तानात २१८ किमी लांबीचा डेलराम ते झरांज सलमा डॅमपर्यंत रस्ता बांधला आहे. तसेच भारताने वर्ष २०१५ मध्ये अफगाणिस्तानची संसदही बांधून दिली आहे.