कोरोनाच्या सर्व नियमांना हरताळ !
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईदनिमित्त झालेल्या गर्दीविषयी अंनिस, बुद्धीप्रामाण्यवादी आवाज उठवणार नाहीत, हे लक्षात घ्या !
सातारा, १७ जुलै (वार्ता.) – बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील बकरी बाजारात प्रचंड गर्दी झाली होती. बाजाराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या वेळी बकरी विक्रेते आणि ग्राहक यांच्याकडून कोरोनाच्या नियमावलीला हरताळ फासण्यात आला आहे.
या बाजारात ३ ते ४ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अनुमान व्यक्त केला जात आहे. पहाटे ४ वाजल्यापासून बाजाराला प्रारंभ झाला. बकरी विकत घेण्यासाठी गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील गावांतून २० सहस्रांहून अधिक खरेदीदार आले होते. या वेळी प्रचंड वाहनकोंडी झाली होती.
अंनिसची भूमिका काय ?
हिंदु धर्मातील प्रत्येक सणावर संधान साधत पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी आवाहन करणारे अंनिसवाले कुठे आहेत ? बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अंनिसने कोणतेही आवाहन पत्रक काढलेले नाही. अंनिस केवळ सहिष्णू हिंदु धर्मियांच्याच मागे लागते आणि इतर धर्मियांतील प्रथांविषयी बोलण्यास घाबरते का ?, असे प्रश्न प्राणिमित्र आणि सजग नागरिक उपस्थित करत आहेत.