सामाजिक माध्यमांतून रोष व्यक्त झाल्यावर आस्थापनाने ‘इस्लामपूर’ नाव असलेला त्यांचा फलक २४ घंट्यांत हटवला !

वाळपई शहरात ‘इस्लामपूर’ या नवीन वाड्याची निर्मिती झाल्याचे प्रकरण

हिंदूंनी संघटितपणे हिंदूविरोधी कारवायांना विरोध केल्यास विरोधक नमतात, हे लक्षात घेऊन नेहमी हिंदूंनी संघटित राहिले पाहिजे ! अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी काही जन्माने हिंदु असलेले; पण तथाकथित पुरोगामी विचारसरणीचे लोक कार्यरत असतात, तेही हिंदूविरोधीच ठरतात, हे येथे लक्षात घ्यावे !

वाळपई (गोवा), १० जुलै ,वार्ता. – काही वर्षांपूर्वी शहरात एका चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यास विरोध झाल्यामुळे येथील शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवणे शक्य झाले नव्हते; मात्र याच परिसरात ‘इस्लामपूर’ या नवीन वाड्याची निर्मिती झाल्याचे दर्शवणार्‍या ‘इस्लामपूर, हातवाडा’ असा पत्ता असलेल्या फलकाचे चित्र ९ जुलै या दिवशी सामाजिक माध्यमांत प्रसारित झाले होते; मात्र स्थानिकांच्या रोषामुळे ‘इस्लामपूर’ असा उल्लेख असलेल्या पत्त्याचा आस्थापनाचा फलक संबंधित ठिकाणावरून हटवण्यात आला आहे. याविषयीची ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांत प्रसारित होऊ लागल्यावर २४ घंट्यांच्या आत फलक संबंधित ठिकाणावरून हटवण्यात आला आहे.

सामाजिक माध्यमांत ‘नॅशनल ट्रेडींग कंपनी’चा ‘इस्लामपूर, हातवाडा, वन खात्याच्या कार्यालयाजवळ, वाळपई’, हा पत्ता असलेला फलक ९ जुलै या दिवशी सामाजिक माध्यमांत प्रसारित होत होता. यावर ‘‘वाळपई येथे हिंदू आणि मुसलमान बांधव एकजुटीने रहातात; मात्र परप्रांतीय मुसलमांनांची संख्या वाळपई शहरात वाढत आहे. वाळपई शहरात ‘इस्लामपूर’ची निर्मिती म्हणजे मतपेढीचे राजकारण आहे’’, अशा आशयाच्या प्रतिक्रिया सामाजिक माध्यमांत व्यक्त केल्या जात होत्या. यामुळे अखेर ‘इस्लामपूर’ नाव असलेला फलक हटवण्यात आला. या परिसरातील एका प्रथितयश विद्यालयाचा पत्ता गूगलवर शोधल्यास पत्त्यामध्ये ‘इस्लामपूर, हातवाडा, वाळपई’, असा उल्लेख आढळतो. ‘शासकीय अनुदानित विद्यालयाच्या पत्त्यामध्ये ‘इस्लामपूर’ असे नाव कसे जोडले जात आहे ?’, असा प्रश्न सध्या सूज्ञ नागरिकांकडून विचारला जात आहे.

शैलेंद्र वेलिंगकर,

वाळपई (गोवा) शहरात ‘इस्लामपूर’ या नवीन वाड्याची निर्मिती होणे, ही गोष्ट धक्कादायक ! – शैलेंद्र वेलिंगकर, श्री परशुराम सेना