सौ. स्मिता नाणोसकर
१. ‘पू. सामंतआजोबा नेहमी आनंदी असायचे, तसेच ते सर्वांची प्रेमाने विचारपूस करायचे.
२. वेळेचे पालन करणे : ते सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची बांधणी सेवा करायचे. ते सेवेसाठी वेळेतच उपस्थित असायचे.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा भाव
अ. एकदा ते डोळ्यांवर उपचार केल्यावर दुसर्याच दिवशी सेवेला आले होते. त्यांना विश्रांती घेण्यासाठी प्रार्थना केल्यावर त्यांनी सेवा थांबवली. त्यांचे म्हणणे असायचे, ‘‘मी कुठे काय करतो ? सर्व तर परम पूज्यच करतात. मी निमित्त आहे.’’
आ. पू. आजोबा सतत कृतज्ञताभावात असायचे. त्यांना कुणी काही दिले किंवा साहाय्य केले की, ते कृतज्ञता व्यक्त करत. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्यासाठी किती करतात !’, असा त्यांचा भाव होता.
कु. नलिनी राऊत
१. साधी रहाणी : ‘पू. सदाशिव सामंतआजोबा संत होण्यापूर्वी त्यांची जशी साधी रहाणी होती, तशीच ते संत झाल्यानंतरही ती होती.
२. आज्ञापालन करण्याची तळमळ : पू. आजोबा या वयातही देवद आश्रमात सकाळी होणार्या स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाला साधक उपस्थित नसल्यास ते एकटेच स्वरक्षणाचे प्रकार करायचे. ‘संतांनी स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घ्यायला सांगितला आहे, तर तो बंद पडायला नको’, असे ते नेहमी सांगायचे.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव
१. काही चांगले झाले की, पू. आजोबा त्याचे श्रेय परात्पर गुरु डॉ. आठवले यांना द्यायचे. ‘त्यांच्यामुळेच झाले. ते सर्व व्यवस्था नीट करतात; म्हणून सर्व नीट होते’, असे ते सतत म्हणायचे.
२. पू. आजोबा रुग्णाईत असतांना फेब्रुवारी २०२१ मध्ये पुढील उपचारांसाठी घरी गेले होते. त्यांनी देहत्याग करण्याच्या आदल्या दिवशी मी त्यांची विचारपूस केल्यावर ते मला म्हणाले, ‘‘ताई, मी एकदम छान आहे. मला थोडाफार थकवा आहे; पण या वयात तेवढे चालायचेच ! परम पूज्यांनी दिलेले बोनस आयुष्य मी त्यांच्या कृपेमुळेच आनंदात जगत आहे. त्यांनी माझ्यासाठी आणखी किती करायचे ?’’
सौ. सुलोचना जाधव (वय ७५ वर्षे),
अ. ‘पू. सामंतआजोबा स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग वेळेत चालू करायचे. ते एका सेकंदाचाही विलंब करत नसत.
आ. पू. आजोबांकडे पाहिल्यावर मला पुष्कळ आनंद वाटायचा.’ (११.६.२०२१)