१. ‘गुरुदेवा, चराचरात सामावलेले आपले चैतन्यमय स्वरूप अखंड अनुभवायचे आहे’, याची जाणीव आम्हाला प्रत्येक श्वासागणिक होऊदे ! :
‘जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण (प.पू. गुरुमाऊली), आम्ही अज्ञानी आणि असमर्थ जीव आहोत. आम्हाला तुमच्या स्वरूपाचे ज्ञान करून देण्यासाठी आणि ‘आम्हीही तुमचे अंश आहोत’, हे अनुभवता येण्यासाठी अन् आम्हाला तो आनंद प्रत्येक क्षणी घेता येण्यासाठी तुम्ही अखंड कार्यरत आहात.’
‘हे गुरुमाऊली, आम्ही तुमचीच लेकरे आहोत. त्यामुळे प्रत्येकाचे गुण आणि स्वभावदोष तुम्हाला ठाऊक आहेत. आम्हा प्रत्येकाला तुम्ही जाणता आणि आम्हाला साधनेत पुढे जाण्यासाठी अखंड दिशा दाखवता. कधी संतवाणीतून, तर कधी प्रत्यक्ष आपणच आम्हाला घडवत असता. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही या अज्ञानी जिवांना माध्यम म्हणून निवडले आहे. हे साध्य करतांना तुम्ही आम्हाला मोक्षप्राप्तीही करवून देणार आहात. आताच्या या घोर कलियुगातील आपत्काळात सर्वत्र अराजकता आहे. तुम्ही तेथे आमच्यासाठी स्थुलातून सनातनरूपी आणि मनातही हिंदु राष्ट्र निर्माण केले आहे. ‘हे गुरुमाऊली, हे केवळ तुम्हीच करू शकता; कारण तुम्ही विश्वव्यापी आहात. चराचरात सामावलेले चैतन्याचे स्वरूप आहात. ‘आम्हाला आपले हे रूप अखंड अनुभवायचे आहे’, याची जाणीव आम्हाला प्रत्येक श्वासागणिक होऊदे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !
२. श्रीहरिस्वरूप गुरुनाथा, आमच्या अंतरी भावभक्तीचे दीप प्रज्वलित होऊन ते अखंड उजळत राहूदे ! :
‘हे दयाघना, हे श्रीहरिस्वरूप गुरुनाथा, तुम्ही केवळ आम्हा साधकांच्या उद्धारासाठीच हा वैकुंठलोक निर्माण केला आहे. आम्हाला या वैकुंठलोकात रहाण्याची अमूल्य संधी मिळत आहे. आम्ही त्याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. या भावविश्वात आम्हाला आमचे तन आणि मन शुद्ध करून घेता येऊ दे. ‘तुम्ही आमच्या समवेत आहात’, हे आम्हाला अनुभवता येऊ दे. आमच्या अंतरी भावभक्तीचे दीप प्रज्वलित होऊन ते अखंड उजळत राहू देत.’
३. ‘हे भगवंता, जसे श्रीकृष्णाने कालीया नागाच्या विषापासून यमुना नदीला निर्मळ बनवले, तसे स्वभावदोष आणि अहं यांच्या विषापासून आमचे मन निर्मळ व्हावे; म्हणून तुम्ही हे भावविश्व निर्माण केले आहे.’
४. हे गुरुमाऊली, तुम्हीच आमच्याकडून तुम्हाला अपेक्षित असे भावाच्या स्तरावर प्रयत्न करवून घ्या ! :
आम्हाला मोक्षपदाला घेऊन जाणारे साक्षात् विष्णुस्वरूप गुरुमाऊली आमच्या जीवनात आले आहेत. त्यांनी केवळ आमची साधना आणि उद्धार यांसाठीच हा वैकुंठलोक (रामनाथी आश्रम) स्थापन केला आहे. या वैकुंठलोकात गुरुमाऊली आपल्याला भाव–भक्तीच्या जलाने शुद्ध आणि पावन करत आहेत. ‘हे गुरुमाऊली, तुम्ही करत असलेली अनंत आणि अखंड कृपा आमच्या ध्यानात येऊ दे. तुम्हीच आमच्याकडून तुम्हाला अपेक्षित असे भावाच्या स्तरावर प्रयत्न करवून घ्या’, अशी तुमच्या सुकोमल चरणी प्रार्थना आहे.
५. ‘हे कृपाळू गुरुमाऊली, तुम्ही या भावसत्संगाच्या माध्यमातून आमच्यावर भावगंगा प्रवाहित करत आहात. या प्रवाहात आम्हाला आमचे तन आणि मन शुद्ध करून घेता येऊ दे.’
६. ‘हे कृपाळू गुरुमाऊली, तुमच्या अनंत कृपेमुळे आज आम्हाला भाववृद्धी करणारा भावसत्संग मिळत आहे. त्यासाठी आमच्या मनात अखंड कृतज्ञता राहू दे.’
७. ‘प.पू. गुरुमाऊली, आमच्या आनंदासाठी तुम्ही निरनिराळी माध्यमे बनवून आम्हाला घडवत आहात. कधी साधकांच्या माध्यमातून, तर कधी प्रयत्नांतून आम्हाला योग्य कृती शिकवत आहात. आज तुम्ही समष्टी बनून हा ‘भावयज्ञ’ आरंभला आहे. या भावयज्ञामध्ये तुम्ही प्रत्येकाला सामावून घेतले आहे. या भावयज्ञामध्ये ‘आहुती कशी द्यायची ?’, हे तुम्ही आम्हाला शिकवत आहात.
८. आपली परात्पर गुरुमाऊली केवळ रामनाथी आश्रमात नसून पूर्ण विश्वात आहे. आपल्याला ‘परम पूज्य म्हणजे रामनाथी’, असे डोळ्यांसमोर येत नसून ‘परम पूज्य म्हणजे सनातन’, असे येते. साधनेत आपण गुरुदेवांचे आश्वस्त करणारे वचन ऐकले आहे, ‘स्थूल देहा असे स्थळ काळाची मर्यादा । कैसे असू सर्वदा सर्वा ठायी ।। सनातन धर्म माझे नित्य रूप । त्या रूपे सर्वत्र आहे सदा ।।’ यातून ‘गुरुदेवांनी, म्हणजेच भगवंताने सर्व विश्व व्यापले आहे’, हे लक्षात येते. देश–विदेशांतही भगवंताचे चैतन्य आणि भावविश्व आहे.
९. सर्वव्यापी विष्णुस्वरूप गुरुमाऊली, भावक्षण अनुभवतांना मन अंतर्मुख आणि शिकण्याच्या स्थितीत राहूदे :
अनेकातून एकात नेणार्या; पण संपूर्ण विश्व व्यापलेल्या भगवंताच्या कोमल चरणी प्रार्थना करूया, ‘हे सर्वव्यापी विष्णुस्वरूप गुरुमाऊली, संपूर्ण विश्व तुझेच अस्तित्व आणि चैतन्य यांद्वारे भारित आहे. तूच आमच्यासाठी हे भावविश्व निर्माण केले आहेस. या भावविश्वात आम्हाला भावभक्तीत न्हाऊन निघता येऊ दे. ‘प्रत्येक निर्जीव वस्तूतही तूच आहेस’, हे आम्हाला अनुभवता येऊ दे. ‘हे भावक्षण अनुभवतांना मन अंतर्मुख आणि शिकण्याच्या स्थितीत राहू दे’, अशी तुझ्या पावन चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.
१०. सर्वव्यापी विष्णुस्वरूप गुरूमाऊली, आपण आमच्यावर जी भावभक्तीची गंगा प्रवाहित करत आहात, त्यात आम्हाला शरीर आणि मन शुद्ध करता येऊदे ! :
‘हे सर्वव्यापी विष्णुस्वरूप गुरुमाऊली, आपल्या अनंत कृपेमुळे आम्हाला या भाववृद्धी सत्संगाला बसण्याची संधी मिळाली आहे. हा भावसत्संग वैकुंठातच होत आहे’, हा भाव ठेवून आम्हाला आपल्यातील विष्णुतत्त्व ग्रहण करता येऊ दे. आपण आमच्यावर जी भावभक्तीची गंगा प्रवाहित करत आहात, त्यात आम्हाला शरीर आणि मन शुद्ध करता येऊ दे’, अशी आपल्या कोमल चरणी प्रार्थना आहे.
११. हे वैकुंठस्वामी विष्णुस्वरूप गुरुमाऊली, आम्हाला आपल्या भावभक्तीच्या बंधनात बांधा ! :
हे वैकुंठस्वामी विष्णुस्वरूप गुरुमाऊली, आम्ही आपल्या चरणी संपूर्णत: शरण आलो आहोत. आम्हाला स्वभावदोष आणि अहं यांच्या बंधनातून मुक्त करून आपल्या भावभक्तीच्या बंधनात बांधा. आम्हाला आपले अस्तित्व प्रत्येक क्षणी अनुभवता येऊ दे. गुरुमाऊली, या भावविश्वात आमचे मन अंतर्मुख आणि शिकण्याच्या स्थितीत ठेवा.
१२. गुरुमाऊली, तुमचे अस्तित्व आम्हाला अनुभवता येऊ दे ! :
‘हे भवसागरातून भावसागरात नेणार्या गुरुमाऊली, आम्ही आपल्या चरणी शरण आलो आहोत. तुम्हीच आमच्यासाठी भावसागर आहात. भावभक्तीने ओसंडून वहात असलेल्या भावक्षणांचा आम्हाला लाभ करून घेता येऊ दे आणि तुमचे अस्तित्व आम्हाला अनुभवता येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.
११. दयाघना, आपल्या चरणांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य आणि या भावसागरातील भावाचा ओलावा आम्हाला अनुभवता येऊ दे :
हे दयाघना, आम्हाला तुमच्या चरणांपर्यंत पोचण्यात जे अडथळे येतात, त्यावर तुम्हीच मात करवून घेतली. त्यासाठी आम्ही तुमच्या चरणी कृतज्ञ आहोत. हे भगवंता, तुम्ही आमच्याकडून जसा नामजप आता करवून घेत आहात, तसा आमचा नामजप सातत्याने होऊ दे. आपल्या चरणांवर मन एकाग्र करून आपल्या चरणांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य आणि या भावसागरातील भावाचा ओलावा आम्हाला अनुभवता येऊ दे.’
१२. कृपाश्रेष्ठ गुरुमाऊली, प्रत्येक क्षणी आम्हाला भावस्थितीत रहाता येऊ दे :
‘हे कृपाश्रेष्ठ गुरुमाऊली, आम्हाला प्रीतीस्वरूप गुरुमाऊलीच्या कृपेने आजचा अमूल्य भावसत्संग मिळाला. त्यासाठी आम्ही आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत. हे कृपाळू गुरुमाऊली, या भावसत्संगात आपण आमच्यावर भावाची गंगा प्रवाहित करत आहात. या भावगंगेच्या प्रवाहात आम्ही तन आणि मन शुद्ध करू शकलो. आपल्या अनंत कृपेने आम्हाला भावामध्ये वृद्धी करणारा भाववृद्धी सत्संग मिळत आहे. आमच्या मनात या भाववृद्धी सत्संगाच्याप्रती कृतज्ञताभाव राहू दे. प्रत्येक क्षणी आम्हाला भाव अनुभवता येऊ दे.’
– कु. माधुरी दुसे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.२.२०१७)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |