दैनिक ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. दास महाराज यांच्या अवतारत्वाविषयीची सूत्रे वाचल्यावर परात्पर गुरुदेवांविषयी स्फुरलेले काव्य !
‘८.६.२०२० या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘प.पू. दास महाराज यांनी बालपणापासून केलेली मारुतीची भक्ती आणि त्यांना ध्यानावस्थेतील मारुतिरायाचे झालेले सगुण दर्शन !’ याविषयीच्या लेखातील परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. दास महाराज यांच्या अवतारत्वाविषयीची सूत्रे मी पुनःपुन्हा वाचली अन् त्या दोघांच्या चरणी मनोमन माथा टेकवला. तेव्हा ‘तेजाचा एक झोत माझे तन-मन यांना व्यापत आहे’, असे मला वाटले. काही क्षणांतच माझ्याकडून पुढील काव्य कागदावर उमटले गेले. एका अज्ञानी बालकाला त्याची आई पाटीवर अक्षरे लिहिण्यास शिकवते, त्याप्रमाणे गुरुदेवांनी माझा हात धरून हे काव्य निर्माण केल्याचे मला जाणवत होते. माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना झाली, ‘हे परमात्म्या, तुझे काव्य तुलाच अर्पण करत आहे. या अज्ञानी जिवाला तुझ्या चरणी माथा टेकवण्याच्या पलीकडे काही जमत नाही. आम्हा सर्व साधकांकडून तुला अपेक्षित अशी साधना करवून घे.’
वैखरीतून बोलतो मी ।
सर्वस्व माझे परम पूज्य (टीप १)।
मम जीवनाचे कठीण गणित ।
सोडवतात परम पूज्य ।। १ ।।
वैखरीतून बोलतो मी ।
हरेक कृतीत माझे परम पूज्य ।
अध्यात्म मला जगता यावे ।
नित्य आठवावेत परम पूज्य ।। २ ।।
वैखरीतून बोलतो मी ।
काव्य माझे परम पूज्य ।
काव्यार्थ एक असावा ।
परम पूज्य आणि परम पूज्य ।। ३ ।।
वैखरीतून बोलतो मी ।
देवपूजा म्हणजे परम पूज्य ।
अस्तित्व माझे न उरावे ।
चराचरात दिसावेत परम पूज्य’ ।। ४ ।।
टीप १ : परात्पर गुरु डॉ. आठवले
– श्री. दीपक रामचंद्र छत्रे, रायंगिणी, बांदोडा, गोवा. (९.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |