गुजरातमधील नव्या धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत कारवाई !
|
वडोदरा (गुजरात) – येथील पोलिसांनी बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणी मोहिब पठाण, त्याचा भाऊ मोहसीन आणि वडील इम्तियाज पठाण यांना अटक केली आहे. त्यांच्यावर नव्याने बनवलेल्या धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवणे आणि मारहाण या अंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे तिघे दोषी आढळल्यास त्यांना ३ ते ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. मोहिब याने त्याच्या हिंदु पत्नीला विवाहानंतर धर्मांतरासाठी बाध्य केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यात त्याचा भाऊ आणि वडील यांनी साहाय्य केले. मोहिब याने हिंदु पत्नीला विवाहापूर्वी आश्वासन दिले होते की, विवाहानंतर तिला इस्लाम स्वीकारावा लागणार नाही. (हिंदु तरुणींनो, धर्मांध प्रियकरांकडून मिळणारे असे आश्वासन कसे खोटे असते, हे लक्षात घ्या ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने हिंदु तरुणी धर्मांधांच्या प्रेमाच्या जाळ्यात अलगद अडकतात आणि आयुष्याची राखरांगोळी करून घेतात ! हे रोखण्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी हिंदूंना, विशेषतः तरुणींना युद्धपातळीवर धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात धर्मप्रेम निर्माण करण्यास प्रारंभ केला पाहिजे ! – संपादक)
Gujarat: Man, two others held under anti-conversion law https://t.co/YaBG3emnGM
— TOI Ahmedabad (@TOIAhmedabad) June 24, 2021