धर्मरथात प.पू. भक्तराज महाराज यांचे अस्तित्व जाणवणे आणि ‘धर्मरथाच्या मागच्या बाजूवर ॐ उमटला आहे’, असे दिसणे

धर्मरथ

‘फेब्रुवारी २०२० मध्ये नवीन आणलेल्या धर्मरथाच्या (सनातनचे ग्रंथप्रदर्शन ज्यात लावले जाते, ते वाहन) संदर्भात सेवा करायची होती. एकदा परात्पर गुरुदेव म्हणाले होते, ‘‘हा धर्मरथ म्हणजे चालता-फिरता आश्रम आहे.’’ मी प.पू. भक्तराज महाराज यांना (प.पू. बाबांना) प्रार्थना केली, ‘तुम्हीच आमच्याकडून या धर्मरथाची सेवा तुम्हाला अपेक्षित करवून घ्या.’

त्या वेळी मला प.पू. बाबांचे अस्तित्व जाणवले. धर्मरथात प.पू. बाबांचे छायाचित्र ठेवले आहे. ‘प.पू. बाबा माझ्याकडे पहात आहेत’, असे मला वाटले. त्याच वेळी अकस्मात् ‘धर्मरथाच्या मागच्या बाजूवर ॐ उमटला आहे’, असे मला दिसले. तेव्हा ‘मी प.पू. बाबांना केलेली प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोचली. त्यांनी याची प्रचीती ॐ च्या माध्यमातून दिली’, असे मला जाणवले.’

– एक साधक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (वर्ष २०२०)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक