विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) येथे पालकांनी ३० सहस्र रुपयांचा कुत्रा घेऊन न दिल्याने १६ वर्षीय मुलाची आत्महत्या

मुलांना लहानपणापासून साधना न शिकवल्यामुळे ते अशा अशाश्‍वत गोष्टींमध्ये अडकून स्वतःच्या मौल्यवान प्राणाचा त्याग करत आहेत. हिंदु राष्ट्रात प्रत्येकाला धर्मशिक्षणाद्वारे मनुष्यजन्माचा उद्देश सांगून त्याच्याकडून शाश्‍वत आनंद देणारी साधना करूवून घेतली जाईल !

विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) – येथे आई-वडिलांनी कुत्रा घेऊन न दिल्याने षण्मुख वामसी या १६ वर्षांच्या मुलाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. षण्मुख याने पालकांकडून ३० सहस्र रुपयांचा कुत्रा घेण्याची मागणी केली होती. एका ऑनलाईन विक्री संकेतस्थळावर त्याने हा कुत्रा पाहिला होता. ‘सध्या नको. आपण नंतर कधीतरी नक्की घेऊ’, असे आईने त्याला सांगितले होत; मात्र निराशेतून त्याने आत्महत्या केली.