छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेवर कार्यवाही करण्याची नगरपालिका कर्मचार्‍यांची मागणी !

बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी पालिका मुख्याधिकार्‍यांना शिवीगाळ केल्याचे प्रकरण

सातारा – सातारा नगरपालिकेच्या बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप प्रसारीत झाली होती. याचा निषेध करत पालिका कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन केले. याची गंभीर नोंद घेत भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याविषयी पवार यांच्यावर गुन्हा नोंद करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या होत्या. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सूचनेवरून सिद्धी पवार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालिका कर्मचार्‍यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे १५ जून या दिवशी पालिकेचे संपूर्ण कामकाज ठप्प झाले होते.

मंगळवार पेठेत चालू असलेल्या भुयारी गटार योजनेला विलंब होत असल्याने सिद्धी पवार यांनी बांधकाम ठेकेदारास जीवे मारण्याची धमकी दिली होती, तसेच पालिका मुख्याधिकारी यांना शिवीगाळ केली होती.