सध्याच्या कोरोनाच्या रूपाने आपत्काळाची झलक अनुभवायला येत आहे. ‘औषधालयात जावे, तर प्रचंड गर्दी असणे, औषधालयांत औषधे उपलब्ध नसणे, ऑनलाईन औषधे मागवली, तरी दळणवळण बंदीमुळे ती वेळेत न पोचणे, औषधांचा तुटवडा असल्याने त्यांचा काळाबाजार होणे’, असे अनेक वाईट अनुभव अनेकांनी घेतले आहेत. भावी भीषण आपत्काळाला तोंड देण्यासाठी आपण आतापासूनच सिद्धता करणे आवश्यक आहे. आपत्काळासाठीच्या सिद्धतेचा एक भाग म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने सनातन नेहमीच्या विकारांमध्ये लागणार्या आयुर्वेदाच्या २० औषधांची निर्मिती करत आहे. ही औषधे लवकरच उपलब्ध होतील. या औषधांविषयीची माहिती आपण क्रमशः पहात आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/486945.html |
४. सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण
४ अ. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग : हे औषध थंड गुणधर्माचे असून डोळे, त्वचा, केस आणि घसा यांना हितकर आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
४ आ. सूचना
१. वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात चूर्ण घ्यावे.
२. ज्येष्ठमध अधिक प्रमाणात पोटात घेतल्यास उलटी होते. त्यामुळे तो प्रमाणातच घ्यावा.
५. सनातन उशीर (वाळा) चूर्ण
५ अ. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग : हे औषध थंड गुणधर्माचे असून पित्त आणि कफ नाशक आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
५ आ. सूचना : वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात चूर्ण घ्यावे.
६. सनातन मुस्ता (नागरमोथा) चूर्ण
६ अ. गुणधर्म आणि संभाव्य उपयोग : हे औषध थंड गुणधर्माचे असून पित्त आणि कफ नाशक आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
६ आ. सूचना : वयोगट ३ ते ७ यासाठी पाव आणि ८ ते १४ यासाठी अर्ध्या प्रमाणात चूर्ण घ्यावे.
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.६.२०२१)
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/487568.html |