असे शिक्षण सर्वच विश्वविद्यालयांनी द्यावे, असेच जनतेला वाटेल !
वाराणसी (उत्तरप्रदेश) – काशी हिंदू विश्वविद्यालयामध्ये एम्.बी.बी.एस् डॉक्टर आता आयुर्वेद, तर बी.ए.एम्.एस्. डॉक्टर अॅलोपॅथीचे शिक्षण घेऊ शकणार आहेत. यासाठी विश्वविद्यालयाकडून एक वर्षाचा ‘होलिस्टिक मेडिसिन पीजी डिप्लोमा कोर्स’ (समग्र औषध पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम) चालू करण्यात येणार आहे. यासाठी विश्वविद्यालयाकडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती कोर्स, प्रवेश आणि परीक्षा प्रक्रिया यांची रूपरेषा बनवणार आहे.