तू एकच आमचा धनी ।

(परात्पर गुरु) डॉ. आठवले
श्री. लहू खामणकर

तू एकच आमचा धनी ।
ध्यानी-मनी-चिंतनी तू एकच आमचा धनी ॥ धृ. ॥

तव रूप वसे नयनी, दिला सुवर्णजन्म ज्यांनी ।
ज्याचे लीन व्हावे चरणी, तो तूच आमचा धनी ॥ १ ॥

साधना आम्हा शिकवूनी, जन्म-मृत्यूचे फेरे सांडूनी ।
मोक्षमार्ग दाविला ज्यांनी, तो तूच आमचा धनी ॥ २ ॥

जागृती-स्वप्नी-उन्मनी, स्वभावदोष नि अहं घालवूनी ।
ध्यास श्रीचरणाचा लावला ज्यांनी, तो तूच आमचा धनी ॥ ३ ॥

घेतले आम्हा तव चरणी, कीर्ती केली या भुवनी ।
कृतज्ञता, कृतज्ञता जीवनी, तो तूच आमचा धनी ॥ ४ ॥

– आपला चरणरज,
श्री. लहू खामणकर, वणी, जिल्हा यवतमाळ. (२६.९.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक