‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर, तसेच लाद्यांवर पडलेल्या डागांची दिनांक ११ ते १३ मार्च २०२१ या कालावधीत छायाचित्रे काढण्यात आली. याच डागांची वर्ष २०१३ आणि वर्ष २०१८ मध्येही छायाचित्रे काढण्यात आली होती. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास करता पुढील सूत्रे लक्षात आली.
२ मे २०२१ या दिवशी प्रसिद्ध केलेल्या भागात उत्तरेकडील भिंतीवर उमटलेल्या डागाविषयीची सूत्रे पाहिली होती. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! : https://sanatanprabhat.org/marathi/473926.html
दक्षिणेकडील भिंतीवर उमटलेल्या डागांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दक्षिणेकडील भिंतीवर विविध तोंडवळे दिसणे आणि हे सर्व वर्ष २०१४ मध्ये अधिक स्पष्ट दिसणे, तर वर्ष २०२१ मध्ये सर्वाधिक स्पष्ट दिसणे, यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दक्षिणेकडील भिंतीवर विविध तोंडवळे दिसतात. या डागांमध्ये मायावी शक्ती वायुतत्त्वाच्या स्तरावर कार्यरत असल्यामुळे या डागांतील तोंडवळे सजीव वाटून ‘या डागांतील डोळे आपल्याकडे पहात आहेत’, असे जाणवते. वर्ष २०१३ मध्ये या डागांमध्ये निर्गुण-सगुण स्तरावर त्रासदायक शक्ती कार्यरत असल्यामुळे हे डाग स्पष्ट दिसत नव्हते. त्यानंतर ही त्रासदायक शक्ती न्यून झाल्यामुळे तिची खोलीतील निर्गुण चैतन्याशी लढण्याची क्षमता न्यून होऊन ती सगुण-निर्गुण स्तरावर कार्यरत होऊन प्रकट होऊ लागली. त्यामुळे वर्ष २०१३ मधील छायाचित्रांच्या तुलनेत वर्ष २०१४ मधील छायाचित्रात डाग अधिक स्पष्ट दिसत आहेत. वर्ष २०२१ मध्ये या डागांतील सर्व त्रासदायक शक्ती पूर्णपणे क्षीण होऊन ती सगुण स्तरावर प्रकट झाल्यामुळे या डागांतील तोंडवळे वर्ष २०२१ मध्ये सर्वाधिक स्पष्ट दिसत आहेत.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील दक्षिणेकडील भिंतीच्या वर्ष २०१३ मध्ये काढलेल्या छायाचित्राच्या तुलनेत वर्ष २०२१ मध्ये काढलेल्या छायाचित्रात भिंतीवरील डाग न्यून झाल्याचे दिसण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव : वर्ष २०१३ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर वाईट शक्ती दक्षिणेकडून पुष्कळ प्रमाणात आक्रमणे करत होत्या. ही आक्रमणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्थूलदेहावर अधिक प्रमाणात झाल्यामुळे या आक्रमणांचा स्तर सगुण-निर्गुण होता. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहाचे वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्या चैतन्यदायी खोलीतील दक्षिणेकडील भिंतीने ही आक्रमणे स्वतःवर झेलली. त्यामुळे दक्षिण बाजूच्या भिंतीवर विविध प्रकारचे डाग उमटले. याच कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर महामृत्यूयोगाचे संकट येऊन त्यांची प्राणशक्ती न्यून होऊ लागली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे महामृत्यूयोगाच्या संकटापासून रक्षण करण्यासाठी शिवाची शक्ती कार्यरत झाली. ही शिवाची शक्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दिशेने प्रक्षेपित झाली आणि ती त्यांच्या खोलीतील उत्तरेकडील भिंतीमध्ये निर्गुण-सगुण स्तरावर कार्यरत झाली. या भिंतीतून दक्षिणेकडील भिंतीवरील डागांवर शिवाच्या निर्गुण-सगुण स्तरावरील शक्ती आणि चैतन्य यांचे प्रक्षेपण झाल्यामुळे दक्षिणेकडील भिंतीवरील डागांमध्ये कार्यरत असणार्या विघातक त्रासदायक शक्तीचे प्रमाण न्यून झाले. त्यामुळे दक्षिणेकडील भिंतीवर उमटलेल्या डागांचे प्रमाण न्यून झाल्याचे वर्ष २०२१ मध्ये दिसले. त्याचबरोबर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या देहाभोवती शिवाची शक्ती महामृत्यूंजय कवचाच्या रूपाने कार्यरत झाल्यामुळे त्यांच्यावरील महामृत्यूयोगाचे संकट दूर झाले.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.४.२०२१)
वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्यांना विनंती !‘सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात अनेक बुद्धीअगम्य घटना घडत असतात. त्यामध्ये एक आहे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील भिंतींवर २०१३ ते वर्ष २०२१ पर्यंत उमटलेल्या विविध आकृत्या आणि त्यांमध्ये आपोआप झालेले पालट ! ‘भिंतीवर अशा आकृत्या उमटण्याचे वैज्ञानिकदृष्ट्या कारण काय आहे ? त्यामध्ये आपोआप पालट कसे होतात ? त्याचे कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करायचे ?’ या संदर्भात वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’ – व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (संपर्क : श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, ई-मेल : [email protected]) |
|