पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – भारत शासनाच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वय मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय संख्याशास्त्राच्या स्पर्धेत भेंडीशेगाव (तालुका पंढरपूर) येथील प्रशांत ननवरे यांनी भारतामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे वर्ष २०१४ नंतर प्रथमच महाराष्ट्रातील विद्यार्थ्याने या देशपातळीवरील स्पर्धेत पारितोषिक मिळवल्याने प्रशांत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रशांत ननवरे सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापिठाचा संख्याशास्त्र विभाग आणि प्रगत अध्ययन केंद्र येथे शिकतात. या स्पर्धेत देशातील सर्व विद्यापिठांच्या संख्याशास्त्र विषयामध्ये पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी झाले होते.