१. ‘व्हॉट्सॲप’वर मैत्रिणींच्या गटात संदेश पाठवणे आणि आलेले संदेश वाचणे’ यांत रमले असतांना ‘ग्रंथातून परात्पर गुरु डॉक्टर ‘तुझे व्हॉट्सॲप पहाणे मला आवडले नाही’, असे सांगत असल्याचे जाणवणे : ‘३१.३.२०२१ या दिवशी मी कोल्हापूर सेवाकेंद्रातून स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात आले. १०.४.२०२१ या दिवशी रात्री मी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य अन् आध्यात्मिक संशोधन’ हा ग्रंथ माझ्या उशाजवळ ठेवला होता. मी ‘व्हॉट्सॲप’वर मैत्रिणींच्या गटात संदेश पाठवणे आणि आलेले संदेश वाचणे’ यांत रमले होते. तेव्हा मला जाणवले, ‘त्या ग्रंथातून परात्पर गुरु डॉक्टर माझ्याकडे पाहून ‘तुझे व्हॉट्सॲप पहाणे मला आवडले नाही’, असे सांगत आहेत.’
२. ग्रंथ समोर ठेवून नामजप करतांना परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवून स्वतःतील स्वभावदोषांची जाणीव होणे : दुसर्या दिवशी मी हा ग्रंथ समोर ठेवून नामजप करतांना ‘ते माझ्याकडे पहात आहेत. खोलीत मी एकटी नाही, तर ते सूक्ष्मातून उपस्थित आहेत’, असे मला जाणवत होते. त्या वेळी ‘मी त्यांच्या चरणांवर तन, मन, धन आणि सर्वस्व अर्पण करण्यासाठी आले असतांना त्यांना आवडत नसलेला स्वभावदोष मी माझ्याजवळ कशाला ठेवू ?’, असे मला वाटले.
परात्पर गुरुदेवांनी माझ्या प्रक्रियेला आरंभ करून दिल्यामुळे त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता आणि गुरुचरणी शिरसाष्टांग नमस्कार !’
– सौ. अरुणा पोवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.४.२०२१)
|