पावसाळ्यात होणार्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी पालिकेची विशेष मोहीम !
पुणे – प्रतिवर्षी पावसाळ्यात सीमा भींती आणि जुन्या इमारती कोसळून होणारी जीवितहानी लक्षात घेऊन महापालिकेने जुन्या इमारती आणि सीमा भींती यांचे सर्वेक्षण चालू केले आहे. आतापर्यंत ३०० ठिकाणी पहाणी करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात अंदाजे २११ वाडे धोकादायक स्थितीत असून १५० ठिकाणी दुरुस्ती झाली आहे, तर किरकोळ धोकादायक असलेल्या ११५ वाड्यांना पालिकेने सूचना (नोटीस) पाठवली आहे. तर ३३ धोकादायक वाडे आणि इमारती जमीनदोस्त केले आहेत, अशी माहिती अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत यांनी दिली.