कृतज्ञ आम्ही परम पूज्य, ऐसी संतद्वयी आम्हाला दिली ।

पू. (सौ.) भावना शिंदे
पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर

दोन आध्यात्मिक सख्या पू. भावनाताई (टीप १) आणि पू. शिल्पाताई (टीप २) ।

सौ. राजलक्ष्मी जेरे

एकमेकींच्या संगतीने संतपदी विराजमान झाल्या ।
विदेशांतील साधकांच्या साधनेचे दायित्व घेतले ।। १ ।।

शरणागतभावाने घराचा आश्रम बनवला ।
साक्षात् रामनाथी आश्रम विदेशात आणला ।। २ ।।

साधकांना मायेचा आश्रय दिला ।
आणि सर्व साधकांच्या त्या ‘आई’ झाल्या ।। ३ ।।

समर्पणभाव ठेवून करती साधनेचे मार्गदर्शन ।
अन् साधकांच्या त्रासांचे करतात निवारण ।। ४ ।।

कृतज्ञ आम्ही परम पूज्य, ऐसी संतद्वयी दिली ।
या रज-तम युगात आम्ही सत्ययुगाची सावली अनुभवली ।। ५ ।।

प्रार्थना करतो तुमच्या चरणी, ‘त्या’ लवकर सद्गुरुपदी पोचू देत ।
सर्व साधकांवर त्यांची मायेची सावली अशीच राहू दे ।। ६ ।।

टीप १ : पू. (सौ.) भावना शिंदे

टीप २ : पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर

– सौ. राजलक्ष्मी जेरे, सॅन डिएगो, अमेरिका. (३.४.२०२१)