प्रत्येक जिवाला साधनेची गोडी लावणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
हे गुरुदेव, तुम्ही सदैव चिरंजीव रहाणार ।
साधक, संत आणि सृष्टी तुमची ऋणी रहाणार ।
सजीव-निर्जीव चराचर, सर्वत्र तुमची कीर्ती होणार ।
तुम्ही पेरलेल्या धर्मज्ञानाचे ग्रंथरूपी बीज ।
वटवृक्ष होऊन सदैव डोलत रहाणार ।
हे गुरुदेव, तुम्ही सदैव चिरंजीव रहाणार ।। १ ।।
साधनेने साधकांच्या हृदयातले
तुमचे स्थान चैतन्याने फुलून जाणार ।
हे दयासागरा, तुमच्या प्रीतीने कलियुगातही सत्ययुग येणार ।
हे गुरुदेव, श्रीमन्नारायणाच्या प्रीतीसागराचा प्रत्यक्ष तुम्ही अवतार ।
काळही तुमची अनंत कीर्ती गाणार ।
हे गुरुदेव, तुम्ही सदैव चिरंजीव रहाणार ।। २ ।।
‘गुरुदेव सदैव आपल्यामध्ये असले पाहिजे’, असा विचार मनात येऊन माझे मन व्याकुळ झाले. त्या वेळी मी वरील कविता लिहिली. मला वाटले, ‘देव माझ्या मनाला आधार देण्यासाठी हे लिहून घेत आहे’; पण जेव्हा गुरुदेवांच्या जन्मोत्सवाचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम झाला, त्या वेळी त्यातील कार्यक्रमात सद्गुरु अप्पाकाका (सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) यांनी ‘गुरुदेवांनी मृत्यूवर विजय प्राप्त केला आहे’, असे सांगितले. तेव्हा वरील कवितेचा अर्थ माझ्या लक्षात आला आणि माझी भावजागृती झाली.’
– श्री. प्रसाद हळदणकर, बेळगाव (१.५.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |