समाजवादी पक्षाचे खासदार एस्.टी. हसन यांचा दावा !
मुसलमान आणि ख्रिस्ती नेते कोरोना नष्ट होण्यासाठी देवाला शरण जाण्याचे आवाहन करतात; मात्र एकही हिंदू नेता अशा प्रकारचे आवाहन करत नाही; कारण ते स्वतःला अधिक पुरो(अधो)गामी आणि विज्ञाननिष्ठ समजतात !
नवी देहली – कोरोना हा काही आजार नाही. कोरोना जर आजार असता, तर जगात त्यावर काहीतरी उपाय असता. कोरोनाचे संकट हे केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे आलेले संकट आहे. अल्लासमोर रडून क्षमा मागितल्यास हे संकट नष्ट होईल, असे विधान उत्तरप्रदेशमधील मुरादाबादमधील समाजवादी पक्षाचे खासदार एस्.टी. हसन यांनी केले आहे.
Samajwadi MP ST Hasan, himself a doctor, says deaths due to Covid are the result of BJP messing with Islamic Sharia lawshttps://t.co/rpLxvKuwCr
— OpIndia.com (@OpIndia_com) June 2, 2021
(म्हणे) ‘केंद्र सरकारने केलेल्या गुन्ह्यांमुळे कोरोनाचे संकट !’ – समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क
खासदार हसन यांच्यानंतर त्यांच्याच समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनीही अशाच प्रकारचे विधान केले आहे. बर्क यांनी म्हटले की, सध्याच्या केंद्र सरकारने शरीयतमध्ये छेडछाड करण्यासह समूहाद्वारे मारहाण करणे (मॉब लिचिंग) आणि इतरही अनेक गुन्हे केले आहेत, ज्यामुळे कोरोनासारखे मोठे संकट देशावर ओढावले आहे. (गोहत्या, लव्ह जिहाद, लँड जिहाद, हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे आदींमुळे कोरोनाचे संकट आले आहे, असे कुणी म्हटल्यास ते चुकीचे कसे ठरील ? – संपादक) मी गेल्याच वर्षी कोरोना हा काही आजार नसल्याचे म्हटले होते. आजार असता, तर त्यावर उपाय असता; मात्र कोरोनाच्या संदर्भात असे नाही. अल्लासमोर रडत रडत चुकींसाठी क्षमा मागणे हा कोरोनावर मात करण्याचा, त्याला नष्ट करण्याचा एकच मार्ग आहे. आम्ही मुसलमानांना मशिदींमध्ये आणि मदरशांमध्ये नमाजपठणाची अनुमती मागितली होती; मात्र सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही. या चुकींमुळेच आज अनेक संकट येत आहेत. (जर असे आहे, तर मध्य-पूर्वेतील देश, अफगाणिस्तान पाकिस्तान आदींमध्ये मशिदींमध्ये जिहादी आतंकवादीच बॉम्बस्फोट घडवून आणतात, अल्पसंख्यांकांचा वंशसंहार केला जातो; म्हणून तेथे कोरोनाचे संकट आले आहे, असे समजायचे का ? – संपादक)