अमेरिकेत लोक ३३ कोटी, तर शस्त्रे ३९ कोटी !

नागरिकांच्या मनातील असुरक्षितेतची भावना कारणीभूत !

  • ही आहे पुढारलेल्या राष्ट्रांची प्रगती ! ही आधुनिक विज्ञानाची देणगीच आहे ! यावरून ‘कितीही प्रगती केली, तरी हिंसक वृत्ती पालटण्यासाठी बुद्धी सात्त्विक असावी लागते आणि त्यासाठी साधनाच करावी लागते’, हे लक्षात घेतले पाहिजे ! हिंदूंनो, यातून तरी विनाशाकडे नेणार्‍या पाश्‍चात्त्यांच्या संस्कृतीचे सत्य स्वरूप लक्षात घेऊन त्यांचे अंधानुकरण टाळा !
  • भारतात जर अशी स्थिती नको असेल, तर जनतेला आतापासून साधना करायला शिकवले पाहिजे !
  • ‘भारतात अल्पसंख्यांकांवरील कथित आक्रमणांवरून असहिष्णुता पसरली असल्याचा सातत्याने अहवाल प्रसिद्ध करणार्‍या अमेरिकेने अगोदर स्वतःच्या देशातील ही भयावह परिस्थिती पहावी’, असे केंद्र सरकारने त्यांना सुनावले पाहिजे !

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षाही तेथील लोकांकडे असलेल्या वैयक्तिक शस्त्रांची संख्या अधिक असल्याचे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात समोर आले आहे. अमेरिकेत एकूण लोक ३३ कोटी लोक रहातात, तर शस्त्रे मात्र ३९ कोटी आहेत. यामध्ये पिस्तूल, बंदुकीपासून ते ‘टोमॅटिक मशीनगन्स’पर्यंतच्या शस्त्रांचा समावेश आहे. अनेकांकडे एकापेक्षा अधिक शस्त्रे आहेत. अमेरिकन नागरिकांच्या मनातील ‘आपला केव्हाही आणि कुणाकडूनही नाहक बळी जाऊ शकतो’, ही असुरक्षिततेची भावना यास कारणीभूत आहे. यामुळे अमेरिकेत शस्त्र खरेदीची अहमहमिका लागलेली दिसून येते.

कॅपिटल हिल्सवरील हिंसाचारानंतर शस्त्रखरेदीत वाढ !

गेल्या वर्षी कॅपिटल हिल्सवर झालेल्या हिंसाचारानंतर शस्त्रखरेदीत अधिकच वाढ झाल्याचे दिसून आले. या हिंसाचारानंतर अमेरिकेत शस्त्रखरेदी करणार्‍यांची संख्या ९० टक्क्यांनी वाढली आहे. टेक्सासमधील एका कुटुंबाकडे तर १७० शस्त्रे आहेत. त्यात मशीनगन्सचाही समावेश आहे. या शस्त्रांचे त्यांनी त्यांच्या घरासमोरच प्रदर्शनही मांडले होते.

शस्त्रांचा वापर आत्महत्येसाठीच अधिक !

‘शस्त्रसज्ज’ अमेरिकन नागरिकांचे वैशिष्ट्य म्हणजे स्वतःकडील शस्त्रांचा वापर   इतरांना मारण्यापेक्षा आत्महत्या करण्यासाठी अधिक प्रमाणात केला जातो. शस्त्राने आत्महत्या करण्याचे प्रमाण जगात ग्रीनलँड देशात सर्वाधिक आहे, तर अमेरिकेचा दुसरा क्रमांक लागतो. यासह स्वतःच्या नव्हे, तर इतरांच्या शस्त्रांद्वारे हत्या होण्यात अमेरिकेचा जगात २८ वा क्रमांक लागतो.

अमेरिकेत शस्त्रास्त्रांच्या आयातीचे प्रमाणही अधिक !

अमेरिकेत शस्त्रास्त्र निर्मितीचा उद्योग प्रचंड प्रमाणात असून अमेरिकेतून जगाला मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे पुरवली जातात. असे असले, तरी अमेरिकेत शस्त्रास्त्रांच्या आयातीचे प्रमाणही अधिक आहे.

ब्रिटनकडून अप्रसन्नता व्यक्त !

ब्रिटनने तर यासंदर्भात स्पष्टपणे अप्रसन्नता व्यक्त केली आहे. ब्रिटनमध्ये गेल्या २ वर्षांत तेथील नागरिकांकडून एक सहस्रापेक्षाही अधिक घातक शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. चौकशीत ही सर्व शस्त्रे अमेरिकेत अधिकृतपणे खरेदी करण्यात येऊन नंतर ब्रिटनमध्ये अवैध मार्गाने पोचवली गेल्याचे उघड झाले. ब्रिटनमधील हिंसाचाराच्या घटनांत अमेरिकन शस्त्रांचा मोठा वाटा असल्याचे दिसून आले आहे. यामुळेच याविषयी ब्रिटनने अप्रसन्नता व्यक्त केली आहे.

एल् साल्वाडोर या देशात बंदुकीमुळे बळी पडणार्‍यांचे प्रमाण जगात सर्वाधिक

एल् साल्वाडोर या देशात बंदुकीमुळे बळी पडणार्‍या सर्वसामान्य नागरिकांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे.