वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षांत २ सहस्र रुपयांच्या नोटा छापल्या जाणार नाहीत ! – रिझर्व्ह बँकेची घोषणा

नवी देहली – वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षात २ सहस्र रुपयांच्या नवीन नोटा छापल्या जाणार नाहीत, अशी घोषणा रिझर्व्ह बँकेने केली आहे. मागील वर्षीदेखील रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपयांच्या नवीन नोटा छापल्या नव्हत्या. रिझर्व्ह बँकेने तिच्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. मूल्याच्या दृष्टीने मार्च २०२१ मध्ये ४ लाख ९० सहस्र कोटी रुपयांच्या २ सहस्र रुपयांच्या नोटा चलनात होत्या, तर मार्च २०२० मध्ये त्याचे मूल्य ५ लाख ४८ सहस्र कोटी रुपये होते.