भीषण आपत्काळामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींची लागवड करा !

आपत्काळातील संजीवनी औषधी वनस्पती !

संत-महात्मे यांच्या सांगण्यानुसार भीषण आपत्काळ चालू आहे. या काळात डॉक्टर, वैद्य, पेठेतील (बाजारातील) औषधे इत्यादी उपलब्ध होणार नाहीत. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. अशा वेळी आपण लागवड केलेल्या औषधी वनस्पतीच उपयोगी पडतील; म्हणून आतापासूनच आपण त्यांच्या लागवडीकडे लक्ष द्यायला हवे. या लेखामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीची आवश्यकता, त्यांच्या लागवडीमुळे होणारे लाभ, तसेच अत्यल्प श्रमात लावता येण्याजोग्या आणि चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती, यांविषयीची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

ग्रंथाचे मुखपृष्ठ

३. चालू शेतीत लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती

योग्य नियोजन करून चालू शेतीतही औषधी वनस्पतींची लागवड करता येते. कोणत्या पिकामध्ये कोणत्या वनस्पती लावता येतात याची सूची पुढे दिली आहे.

४.  पडीक भूमीमध्ये, अत्यल्प श्रमांमध्ये, तसेच पाणी अल्प असतांना लागवड करता येण्याजोग्या औषधी वनस्पती

४ अ. रानावनांत औषधी वनस्पतींची लागवड करावी न लागणे : रानावनांत अनेक औषधी वनस्पती असतात. तेथे कोणी या वनस्पतींची लागवड केलेली नसते. एखाद्या झाडाचे बी मातीत पडते. पावसाळ्याच्या दिवसांत परिस्थिती अनुकूल झाल्यावर ते बी अंकुरते. वनामध्ये झाडांचा पालापाचोळा पडून माती सुपीक झालेली असते. या सुपीक भूमीत अशा वनस्पती वाढतात. या वनस्पतींना पावसाचे पाणी पुरेसे होते. पाऊस संपल्यावर दव आणि हवेतील आर्द्रता, तसेच भूमीतील ओलावा यांच्यावर या वनस्पती जगतात.

४ आ. स्वतःकडील भूमी विनावापर पडीक ठेवण्यापेक्षा त्यावर औषधी वनस्पती लावणे लाभदायक असणे : आजकाल सर्वत्रच ‘शेतीकामासाठी कुणी कामगार मिळत नाही आणि मिळाला, तरी त्याची मजूरी परवडत नाही’, अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत अत्यल्प श्रमांमध्ये, तसेच न्यूनातिन्यून व्ययामध्ये औषधी वनस्पतींची लागवड करता येऊ शकते. काही जणांकडे मोठी भूमी विनावापर पडून असते. या भूमीवर पावसाळ्याच्या दिवसांत औषधी वनस्पतींचे बी टाकल्यास त्यातील काही वनस्पती तरी उगवून येतील. भूमी विनावापर पडीक ठेवण्यापेक्षा अशा भूमीमध्ये थोडेसे प्रयत्न करून बीजारोपण करणे कधीही चांगलेच नाही का ?

४ इ. पावसाळ्यात प्रत्येकालाच स्वतःच्या क्षमतेनुसार औषधी वनस्पतींचे बीजारोपण करणे शक्य असणे : पुढे केवळ पावसाच्या पाण्यावर वाढू शकतील अशा औषधी वनस्पतींची माहिती दिली आहे. ही माहिती पाहिल्यावर लक्षात येईल की, यांतील काही वनस्पती केवळ औषधांसाठीच नव्हे, तर कुंपण म्हणून, तसेच फुले आणि फळे मिळवण्यासाठीही लावता येतील. स्वतःकडील भूमीच्या उपलब्धतेनुसार यांतील शक्य तेवढ्या वनस्पती लावाव्यात. स्वतःजवळ भूमी नसल्यास आपल्या शेजार्‍यांच्या किंवा मित्रांच्या भूमीमध्येही त्यांच्या अनुमतीने पावसाळ्यात बीजारोपण करावे. बीजारोपण करतांना पुढे झाड मोठे झाल्यावर त्याचा अडथळा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. औषधी वनस्पती शास्त्रीय पद्धतीने, म्हणजेच योग्य खड्डा खोदून रोप लावणे, अशा प्रकारे लावल्यास त्यांच्या जगण्याचे, तसेच वाढीचे प्रमाण चांगले असते. पावसाच्या आरंभी वृक्षवर्गीय वनस्पतींची ४ ते ६ फूट उंचीची परिपक्व रोपे लावल्यास त्यांचे जगण्याचे प्रमाण चांगले असते. पाऊस संपतांना वनस्पतींच्या रोपांभोवती आळी करून त्यांत पालापाचोळा पसरून ठेवल्यास पावसानंतर झाडाला १५ ते ३० दिवसांनी एकदा पाणी दिले, तरी पुरते. लहान झाडे, वेली, झुडुपे, वृक्ष आदींची लागवड योग्य प्रकारे कशी करावी, याचे विवेचन सनातनचा ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’ यात केले आहे. (क्रमशः)

(साभार : सनातनचा ग्रंथ ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’)

आपत्काळाच्या दृष्टीने वनौषधींच्या लागवडीचे महत्त्व दर्शवणारी ही लेखमाला साधक आणि वाचक यांनी संग्रही ठेवावी.

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३१५३१७