दक्षिण गोवा अधिवक्ता संघटनेची गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट
मडगाव, २७ मे (वार्ता.) – गोव्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सीजनअभावी कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र अन्वेषण समिती नेमून अन्वेषण करण्याची मागणी करणारी याचिका दक्षिण गोवा अधिवक्ता संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी रुग्णांच्या मृत्यूसाठी कोण उत्तरदायी आहेत ? याचाही शोध घेण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.
दक्षिण गोवा अधिवक्ता संघटनेने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनच्या अभावी कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत असल्याची घटना प्रथम उघडकीस आणली होती, तसेच राज्यातील कोरोना व्यवस्थापनावरून संघटनेने गोवा खंडपिठात जनहित याचिकाही प्रविष्ट केली आहे.