पणजी – गोमेकॉत ‘ब्लॅक फंगस’ची १० प्रकरणे नोंद झालेली आहेत आणि यामधील ६ रुग्णांना उपचार मिळालेले आहेत, तर तिघांना उपचार मिळणे बाकी आहे. यामधील एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.
‘ब्लॅक फंगस’ प्रकरणाविषयी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले, ‘‘राज्यात ‘ब्लॅक फंगस’ची प्रकरणे वाढत असल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील कक्ष क्रमांक (वॉर्ड) १०२ ‘ब्लॅक फंगस’च्या रुग्णांवरील उपचारासाठी आरक्षित करण्यात आला आहे. या कक्षामध्ये रुग्णांच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणावर देखरेख ठेवण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. या कक्षात उपचारासाठी विविध कौशल्य (मल्टी स्पेशालिटी) असलेले डॉक्टर उपलब्ध असतील.’’