बार्शी येथील अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे सुपुत्र वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांचे निधन

वाजपेययाजी केतन काळेगुरुजी

बार्शी (जिल्हा सोलापूर) – येथील अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे ज्येष्ठ सुपुत्र वाजपेययाजी केतन काळेगुरुजी (वय ५६ वर्षे) यांचे २० मे या दिवशी कोरोना संसर्गामुळे निधन झाले. १५ मे या दिवशी वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांचा मोठा मुलगा भार्गव काळे (वय २६ वर्षे) यांचेही कोरोना संसर्गामुळे निधन झाले. वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा आणि मुलगी आहेत. सनातन परिवार काळे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांच्याप्रमाणेच वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांचे सनातन संस्थेविषयी विशेष स्नेह होता.

 ‘श्री योगीराज वेद विज्ञान आश्रम’ येथे द्वितीय ‘साग्निचित् अश्‍वमेध महासोमयागा’वेळी ‘अश्‍वीय होमा’चे पौरोहित्य करणारे वाजपेययाजी केतन काळे गुरुजी ! 

‘साग्निचित् अश्‍वमेध महासोमयागा’चा संकल्प करतांना परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या समवेत वाजपेययाजी केतन काळे गुरुजी (वर्ष २०१६)

१४ एप्रिल २०१६ या दिवशी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत आणि संपूर्ण विश्‍वात सुख अन् शांती नांदावी, यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कासारवाडी येथील ‘श्री योगीराज वेद विज्ञान आश्रम’ येथे द्वितीय ‘साग्निचित् अश्‍वमेध महासोमयागा’चे आयोजन करण्यात आले होते. या यागाचा संकल्प सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या शुभहस्ते १४ एप्रिल २०१६ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आला होता. या वेळी अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळे गुरुजी यांचे ज्येष्ठ चिरंजीव वाजपेययाजी केतन काळे गुरुजी आणि वेदमूर्ती श्री. धनंजय गोडबोले उपस्थित होते. त्यानंतर त्याच्या अंगभूत ‘अश्‍वीय होम’ करण्यात आला. या होमाचे पौरोहित्य वाजपेययाजी केतन काळे गुरुजी आणि वेदमूर्ती श्री. धनंजय गोडबोले गुरुजी यांनी केले होते.