संभाजीनगर येथे ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान
संभाजीनगर, १४ मे (वार्ता.) – हिंदू शौर्यशाली आणि पराक्रमी आहेत, केवळ त्यांना जागृत करण्याची आज आवश्यकता निर्माण झाली आहे. हिंदूंनी शौर्य गाजवून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. यासाठी कित्येक क्रांतीकारकांना बलीदान द्यावे लागले आहे; पण दुर्दैव असे की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हिंदूंची स्थिती धोक्यात आणली. त्यामुळे हिंदूंनी स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकून इतरांनाही ते शिकवायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी केले. येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात अनेक युवक-युवतींनी सहभाग घेतला. या वेळी श्री. जगदीश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.