जागतिक आतंकवादाचे आव्हान आणि भारत !

प्रतिकात्मक चित्र

१. भारताला विविध आतंकवादी संघटनांपासून असलेला धोका !

‘चीन हा भारताचा क्रमांक एकचा शत्रू असून दुसर्‍या क्रमांकाचा शत्रू पाकिस्तान आहे. अफगाणिस्तान हे आतंकवादाचे माहेरघर आहे. त्यामुळे तेथूनही काही आतंकवादी भारतात प्रवेश करतात. तालिबान आणि इसिस या आतंकवादी संघटना अफगाणिस्तानमध्ये सक्रीय आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर जेवढी आतंकवादी प्रशिक्षण शिबिरे आहेत, तेवढी जगात कुठेही नाहीत. भारताच्या विरोधात लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, हिजबूल मुजाहिदीन, डावे आतंकवादी, म्हणजे माओवादी, ईशान्य भारतात कारवाया करणारे एन्.एस्.सी.एन्.-आय.एम्., एन्.एस्.सी.एन्.-के, दक्षिण भारतात इसिस आणि पी.एफ्.आय.चे आतंकवादी, तर बंगाल अन् आसाम या राज्यांमध्ये जमात-ए- इस्लामिक बांगलादेशी या संघटना कार्यरत आहेत.

२. भारतात कोट्यवधी घुसखोरांनी प्रवेश करणे, हे सीमा सुरक्षा दलाचे अपयश !

११ व्या किंवा १२ व्या शतकापासून भारतावर अनेक आक्रमकांनी आक्रमणे केली. हे आक्रमणकतेर्र् खैबर खिंडीतून यायचे. भारताची सीमा विविध देशांना लागून आहे. भारताला १६ सहस्र किलोमीटर भूमीवरील सीमा लाभली आहे. चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमांवर सैन्य तैनात आहे. नेपाळ आणि भूतान यांच्या सीमांवर अर्धसैनिक दल तैनात आहे. चीनची सीमा आणि काश्मीरच्या काही भागांमध्ये ‘आयटीबीपी’ तैनात आहे. म्यानमारच्या सीमेवर आसाम रायफल तैनात आहे आणि बांगलादेशच्या सीमेवर सीमा सुरक्षा दल तैनात आहे. असे असतांनाही बांगलादेश सीमेवरून कोट्यवधी बांगलादेशींनी घुसखोरी केली आहे.

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

३. येणार्‍या काळात पाकिस्तानशी लढणे भारतापुढील मोठे आव्हान !

वर्ष १९४७ ची भारत-पाक लढाई अनुमाने १ वर्ष चालली. त्या वेळी भारतीय शासनकर्त्यांना ‘पाकिस्तानशी मैत्री करावी’, असे वाटले. त्यामुळे भारताने जिंकलेला काश्मीरचा काही भाग पाकिस्तानला परत केला. हे औदार्य दाखवूनही शांतता निर्माण झाली नाही. तेव्हापासून भारत-पाक सीमेवर सतत लढाई चालू असते. काश्मीर खोरे हे झेलम नदीचे खोरे आहे. काश्मीरमध्ये २०० च्या आसपास आतंकवादी असावेत. या आतंकवाद्यांंपासून देशाचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैनिक सतत प्राणाचे बलीदान देत असतात. पाकिस्तानच्या विरोधात कसे लढायचे, हे येणार्‍या काळात भारतापुढील आव्हान आहे. पाकिस्तानचे तुकडे होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याची शक्ती न्यून होईल; पण ते शक्य वाटत नाही; कारण चीन त्याला मोठ्या प्रमाणात साहाय्य करत आहे. पाकिस्तानची सीमा काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांना लागून आहे. तिच सीमा असुरक्षित आहे. या सीमेचे रक्षण करणे आवश्यक आहे.

४. म्यानमारमधील अशांततेचा भारताच्या आतंकवादाशी संंंबंध !

ईशान्य भारतात असणार्‍या आतंकवाद्यांची प्रशिक्षण शिबिरे भूतानमध्ये असतात. भूतानचे सैन्य मोठे नसल्यामुळे आतंकवाद्यांना तेथे प्रशिक्षण शिबिरे निर्माण करता येतात. म्यानमारची सीमा ही अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर आणि नागालॅण्ड यांना लागली आहे. ईशान्य भागातील बंडखोरांचे शिबिरे ही म्यानमारमध्ये आहेत. काही वर्षांपूर्वी ती चीनमध्ये होती. चीनने त्यांना बाहेर काढल्यानंतर ते म्यानमारमध्ये गेले. म्यानमारमध्ये भारत अनेक वेळा आतंकवाद्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत असतो.

आज म्यानमारमध्ये अशांतता आहे. तेथील राखीन प्रांतात असलेल्या रोहिंग्यांवर म्यानमारने कारवाई केली. त्यानंतर ते बांगलादेशमार्गे भारतात येऊन मुंबईमध्ये आले आहेत. बंगालमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या यांनी स्वतंत्र क्षेत्र निर्माण केले आहे. त्या भागात भारतातील राजकीय पक्ष प्रचारालाही जाऊ शकत नाहीत. हे ४० ते ५० सहस्र रोहिंग्या भारतातच आले; कारण भारतातील काही संस्था त्यांना येथे येण्यासाठी प्रेरित करतात. आजही भारतात रोहिंग्यांना आश्रय मिळावा, यासाठी सर्वोेच्च न्यायालयात खटला चालू आहे. एका देशविरोधी व्यक्तीने ही याचिका प्रविष्ट केली आहे आणि काही दीड शहाणे अधिवक्ते रोहिंग्यांसाठी सर्वोच्च न्यायालयात लढत आहेत. सामान्य नागरिकांना सर्वोच्च न्यायालयामध्ये पोचणे जेथे अशक्य असते, तेथे आतंकवाद्यांसाठी त्यांचे समर्थक आणि काही वलयांकित लोक मात्र थेट सर्वोच्च न्यायालयात भांडत आहेत.

५. आतंकवाद्यांना साहाय्य करणारे हे आतंकवाद्यांहून अधिक धोकादायक !

आतंकवाद्यांना लढण्यासाठी पैसा, दारूगोळा, बंदुका, न्यायालयीन साहाय्य, वैद्यकीय सुविधा, तसेच त्यांची बाजू उचलून धरणार्‍या संघटना लागतात. एक रोहिंग्या म्यानमारमधून महाराष्ट्रातील नांदेडमध्ये पोचला. त्यासाठी त्याने भारताबाहेर ४ सहस्र किलोमीटर प्रवास केला आणि तेवढाच प्रवास भारतातही केला. पोलिसांच्या माहितीनुसार यासाठी त्याला भारतातील अनुमाने ३५ लोकांनी साहाय्य केले होते. त्यांनी त्याला शिधापत्रक आणि आधारकार्ड बनवून दिले होते. हे सर्व पहाता आतंकवादाच्या विरोधात लढत असतांना त्यांच्या समर्थकांच्या विरोधातही सर्वसमावेशक कारवाई करणे आवश्यक आहे.

बांगलादेशने ४ ते ५ कोटी लोकांना भारतात घुसवलेले आहे. आसाममध्ये ३५ टक्के, तर बंगालमध्ये ३० टक्के लोकसंख्या ही बांगलादेशी आहे. या घुसखोरांना तेथील राजकीय पक्ष, संघटना आणि लोक भारतात येण्यासाठी साहाय्य करतात. बंगालमध्ये घुसखोरांना प्रवेश मिळवून देणे, हा एक मोठा उद्योगधंदा बनला आहे. तेथे आपले अर्धसैनिक दल, म्हणजे सीमा सुरक्षा दल काय करतात, हे विचार करण्यासारखे आहे. याविषयी त्यांनाही खडसावण्याची आवश्यकता आहे.

६. अफगाणिस्तान आणि नेपाळ या शेजारी राष्ट्रांमधून भारताला आतंकवादाचा धोका !

अ. अफगाणिस्तानमध्ये आज अशांतता असून तेथील अमेरिकी सैन्य परत जाणार आहे. तसे झाले, तर तेथे तालिबानी आतंकवाद्यांचे राज्य येईल. हे तालिबानी पाकिस्तानच्या अधिपत्याखाली आहेत. आज अफगाणिस्तानमध्ये लक्षावधी तालिबानी अमेरिकेच्या विरुद्ध लढत आहेत. अमेरिकेचे सैन्य परत गेल्यानंतर हे तालिबानी भारतात प्रवेश करतील. त्यानंतर ते काश्मीरमध्ये न्यून झालेला आतंकवाद नव्याने पुनर्जीवीत करतील. त्यामुळे अफगाणिस्तानमधील घडामोडींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

आ. नेपाळ हे हिंदु राष्ट्र असले, तरी तेथून भारताच्या विरोधात कारवाया चालत असतात. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ‘आयएस्आय’चे लोक नेपाळमधून भारताच्या विरोधात काम करतात. तेथून भारतात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची तस्करी होते, तसेच अवैध व्यापार केला जातो. अनेक आतंकवादी नेपाळमधून भारतात प्रवेश करत असतात. मध्यंतरी महाराष्ट्रात पकडलेले ३ मोठे आतंकवादी हे नेपाळमधून आले होते. भारताच्या दक्षिणेतील राज्यांमध्ये काही आतंकवादी हे समुद्र मार्गाने येतात.

७. भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये असलेले अल्पसंख्य हिंदू संपण्याच्या मार्गावर !

वर्ष १९५० मध्ये बांगलादेशमधील अल्पसंख्य समुदायांची, म्हणजे हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख यांची लोकसंख्या २४ टक्के होती. ही लोकसंख्या आज ८ टक्क्यांहून अल्प झाली आहे. वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तानी सैन्याने ४० लाख बांगलादेशींना ठार केले. त्यामध्ये ३० लाखांहून अधिक हिंदू होते. सध्या बांगलादेशमध्ये उरलले हिंदूही भारतात परत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ‘सीएए’ कायदा संमत केला. या कायद्यामुळे पीडित अल्पसंख्य समाजाला भारतात येण्याचा मार्ग सुकर झाला. त्यांची संख्या फार नाही; तरीही काही देशद्रोही लोकांनी त्या विरोधात आंदोेलन केेले होते.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.