लसीकरणाच्या वेळी होणारी गर्दी, गोंधळ आणि मनस्ताप थांबवण्यासाठी प्रशासनाने घरोघरी जाऊन लस देता येईल का ? या पर्यायाचा विचार करावा !
पुणे – लसीकरणासाठी ‘ऑनलाईन बुकिंग’ केले असले, तरी नगरसेवकांनी दिलेले टोकन असल्याविना नागरिकांना लस दिली जात नाही. त्यातच लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी ‘ऑनलाईन’ नोंदणीची आवश्यकता नसते. लसीकरण केंद्राबाहेर नगरसेवकांचे कार्यकर्ते फिरत असून त्यांच्या सूचनेनुसार नागरिकांना लसीकरण केंद्रात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे लसीकरणासाठी अनेक घंटे रांगेत थांबूनही लसीकरण होत नाही, अशा तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या आहेत. टोकन पद्धतीचा अट्टाहास कशासाठी ? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
लसीकरण केंद्रांना मिळणारे लसीचे डोस आणि नागरिकांची संख्या लक्षात घेत नगरसेवकांकडून टोकन पद्धत चालू करण्यात आली. नगरसेवकांच्या संपर्क कार्यालयातून ही प्रक्रिया राबवण्यात येते. त्याचे नियंत्रण कार्यकर्त्यांकडे दिले आहे.