अमरावतीत कोरोनाची तिसरी लाट आल्याची शक्यता ! – यशोमती ठाकूर, मंत्री, महिला आणि बालकल्याण 

यशोमती ठाकूर

अमरावती – जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यात ग्रामीण भागांत मोठ्या प्रमाणावर नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची ‘तिसरी लाट’ आली आहे का ?, अशी शंका राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ११ मे या दिवशी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.

त्या पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने दक्षता घेण्याची आवश्यकता आहे, तसेच जिल्हा यंत्रणेने जागोजागी अन् गावोगावी ‘कंटेन्मेंट झोन’ केले आहेत. त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतांनाही काही लोक प्रशासनाचे ऐकत नाहीत, याची मला खंत वाटते.