धंदा होत नसल्याने नगरपालिकेने १ वर्षाचे भाडे माफ करावे !

जालना येथील व्यावसायिकांची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

जालना – गेल्या वर्षभरापासून शहरातील एकमेव चौपाटी असलेली मोतीबाग बंद आहे. त्यामुळे तेथील व्यावसायिकांचे धंदे बंद आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अवघड झाले असतांना ‘नगरपालिकेचे भाडे कसे भरायचे ?’, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. ‘शासनाने उदरनिर्वाह भत्ता द्यावा, अन्यथा किमान नगरपालिकेने १ वर्षाचे भाडे माफ करावे’, अशी मागणी मोतीबाग येथील व्यावसायिकांनी ४ मे या दिवशी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी संभाजी भोसले, लक्ष्मण मस्के, राम मस्के, गोपाळ चुडावन्त, अविनाश चटाले, रमेश मनसुरे आदी व्यावसायिक उपस्थित होते.